माय महाराष्ट्र न्यूज:एफआरपी थकविणाऱ्या राज्यातील ४३ साखर कारखान्यांना यंदाच्या हंगामात गाळप परवाना देण्यात आलेला नाही. या कारखान्यांनी शेतकऱ्यांची सुमारे तीनशे कोटींची एफआरपी थकविली आहे. शेतकऱ्यांना एफआरपी दिली जात नाही,
तोपर्यंत त्या कारखान्यांना गाळप परवाना दिला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी घेतली आहे.राज्यातील अनेक साखर कारखान्यांमध्ये यंदाच्या गाळप हंगामाला सुरवात झाली आहे. राज्यात सध्या एकरकमी एफआरपीचा मुद्दा
चांगलाच गाजत आहे. त्यातच साखर आयुक्त गायकवाड यांनी कारखान्यांना मोठा दणका दिला आहे. परवाना रोखण्यात आलेल्या साखर कारखान्यांमध्ये सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या साखर कारखान्यांचाही समावेश आहे.
या साखर कारखान्यांचा परवाना रोखलासिद्धनाथ शुगर सोलापूर, जरंडेश्वर शुगर, आयन मल्टीट्रेड (बाणगंगा ससाका, सोलापूर), घृष्णेश्वर शुगर औरंगाबाद, एसजीझेड तासगाव कोल्हापूर, साईकृपा नगर, रत्नप्रभा (गो. दूधना) रेणुका नांदेड, मातोश्री लक्ष्मी शुगर अक्कलकोट सोलापूर,
त्रिधार (नरसिंह) नांदेड, अंबाजोगाई औरंगाबाद,भाऊसाहेब बिराजदार सोलापूर, संत दामाजी कारखाना सोलापूर, युटेक शुगर नगर, खंडाळा तालुका किसनवीर पुणे, कर्मयोगी शंकरराव पाटील कारखाना इंदापूर, किसनवीर भुईंज, कुंटुरकर शुगर नांदेड, साईबाबा नांदेड,
नीरा भीमा कारखाना पुणे, वैद्यनाथ कारखाना परळी, रामेश्वर कारखाना जालना,भैरवनाथ शुगर, डॉ. बा. बा. तनपुरे नगर, पन्नगेश्वर कारखाना, रामेश्वर, सिद्धेश्वर, समृद्धी शुगर, व्यंकटेश्वरा नागपूर, यशवंत कारखाना खानापूर, गडहिंग्लज, घोडगंगा, हुतात्मा अहीर,
आजरा, मकाई कारखाना, इंद्रेश्वर कारखाना सोलापूर, भीमा-टाकळी कारखाना, चंद्रभागा सोलापूर, विठ्ठल रिफायनरी सोलापूर, शरयू शुगर पुणे.”एफआरपी थकविल्यामुळे ४३ साखर कारखान्यांना गाळप परवाना देण्यात आलेला नाही.