Sunday, June 4, 2023

गुढी उभारण्याचा सकाळचा मुहूर्त हुकला तर…; कधी कराल पूजा?

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
takshashila pravesh dene surur2
previous arrow
next arrow
Shadow
spot_img

माय महाराष्ट्र न्यूज:साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक म्हणजे गुढीपाडवा असल्याने हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या कोणत्याही नव्या गोष्टीला प्रारंभ करणे, खूप शुभ मानले जाते.

खरंतर गुढीपाडवा भारतातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावे असणारा एक प्रमुख सण आहे. दक्षिण भारतातील लोक या सणाला उगादी म्हणतात. तर इतर वेगवेगळ्या ठिकाणी गुढी पाडवा संवत्सर पाडो,

चेती, नवरेह अशा नावांनी ओळखला जातो. दरम्यान “या वर्षी गुढी पाडव्याच्या दिवशी शालिवाहन राजाने सुरू केलेले शालिवाहन शके १९४५ सुरू होत आहे”, अशी माहिती पुरोहित कृष्णात यांनी दिली आहे.

गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते. त्याला ब्रह्म ध्वज देखील म्हटले जाते. गुढीच्या सजावटी बरोबरच परिसरात रंगीबेरंगी रांगोळी काढली जाते. यामुळे सर्वत्र वातावरण चैतन्यमय राहते.

गुढीला नैवेद्य दाखवण्यासाठी, त्याचबरोबर घरामध्ये सणसुदीचा आनंद साजरा करण्यासाठी, प्रत्येक घरात पंच पक्वान्नाबरोबरच गोडधोडही केले जाते. महाराष्ट्रात यामध्ये प्रामुख्याने पुरणपोळी आणि श्रीखंडाचा समावेश असतो.

गुढीपाडवा हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक असल्यामुळे हा संपूर्ण दिवसच शुभ असतो. गुढीपाडवा, दिवाळी पाडवा, दसरा आणि अर्धा मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया असे हे आपल्या संस्कृतीतील साडेतीन

शुभमुहूर्त आहेत. गुढी पाडव्याच्या दिवशी कोणतेही शुभकार्य आपण दिवसभरात कधीही करू शकतो. या दिवशी घर खरेदी करणे, वाहन खरेदी करणे, दागदागिने खरेदी करणे, यासाठी कोणताही विशेष मुहूर्त बघण्याची गरज नसते.

साडेतीन शुभमुहूर्तापैकी एक असल्याने गुढी उभारण्यासाठी साधारणपणे सूर्योदयानंतरची वेळ योग्य असते. तर पूजा करून दुपारी बारा वाजण्याच्या आत गुढीला नैवेद्य दाखवावा, असे पुरोहित संदीप दादर्णे यांनी सांगितले आहे.

 *गुढीपाडवा पूजा मुहूर्त*

सकाळी ६ वाजून २९ मिनिटे ते ७ वाजून ३९ मिनिटापर्यंततर सकाळी ६ वाजून ४३ मिनिटे ते संध्याकाळी ६ वाजून ५१ मिनिटापर्यंत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!