Sunday, July 3, 2022

दिवाळीत का केलं जातं लक्ष्मीपूजन? जाणून घ्या त्याचे महत्त्व काय?

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:लक्ष्मी कुबेर पूजन, अलक्ष्मी निस्सारण गुरुवारी ४ नोव्हेंबर रोजी आहे. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाचा दिवस सर्वांसाठी खूप महत्त्वाचा मानला गेलेला आहे. केवळ पैसा म्हणजे लक्ष्मी नव्हे ! सन्मार्गाने मिळविलेला आणि सन्मार्गाने

खर्च होणाऱ्या संपत्तीला ‘ लक्ष्मी ‘ असे म्हणतात. भ्रष्टाचार, अनीतीने मिळविलेले पैसा म्हणजे लक्ष्मी नव्हे.आज प्रदोषकाळी लक्ष्मी कुबेर पूजन करावयाचे आहे. प्रथम ‘ प्रदोषकाळ ‘ म्हणजे काय ते पाहूया. रात्रीमानाचे पंधरा भाग केले तर एका भागाला ‘ मुहूर्त ‘ म्हणतात.

सूर्य मावळल्यापासून पुढे तीन मुहूर्त ‘ प्रदोषकाल ‘ मानला जातो. यावर्षी आज गुरुवारी सायंकाळी ६-०३ पासून रात्री ८-३५ पर्यंत प्रदोषकाल आहे. आज या वेळेत लक्ष्मी कुबेर पूजन करावयाचे आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करण्यास सांगितलेले आहे.

नवीन वस्त्रालंकार घालून आनंदोत्सव साजरा केला जातो. लक्ष्मी, कुबेर यांची पूजा करावयाची असते. व्यापारी लोक आपल्या हिशेबांच्या वह्यांवर ‘ श्री ‘ अक्षर लिहून वहीचे पूजन करतात.लक्ष्मीची आवड पुराणात एक कथा आहे. आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य स्थान शोधू लागते.

जिथे स्वच्छता, सौंदर्य, रसिकता, उद्योगप्रीयता , श्रम असतील तेथेच लक्ष्मी आकर्षित होते. तसेच ज्या घरात चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, धर्मनिष्ठ, संयमी, सदाचारी, क्षमाशील माणसे राहतात तेथे राहणे लक्ष्मीला आवडते.लक्ष्मी हा शब्द ‘ लक्ष्म ‘ म्हणजे चिन्ह यावरून बनलेला आहे.

मात्र कोणत्या चिन्हावरून लक्ष्मीचा बोध होतो हे मात्र निश्चितपणे सांगता येत नाही. लक्ष्मीचाच पर्यायी शब्द म्हणजे ‘ श्री ‘ होय. आणि श्री हे अक्षर स्वस्तिकापासून तयार झालेले आहे. श्री आणि लक्ष्मी हे दोन्ही शब्द ऋग्वेदात आहेत. श्रीसूक्तानेच लक्ष्मीची उपासना केली जाते.

श्रीसूक्तात कमळ, हत्ती, सुवर्ण आणि बिल्वफळ या गोष्टी लक्ष्मीशी निगडीत असल्याचे म्हटले आहे.” लक्ष्मी हत्तीच्या आवाजाने जागी होते. बिल्व तिचा वृक्ष आहे. ती सुवर्णाची आहे. ती आल्हाददायक आहे. ती स्वत: तृप्त असून तृप्ती देणारी आहे. तिचा वर्ण कमलासारखा

असून ती कमलावरच बसलेली आहे. “श्रीसूक्तात लक्ष्मीची प्रार्थना करताना तिचे काव्यात्मक सुंदर वर्णन केलेले आहे. “कमलात वास्तव्य करणाऱ्या , कमल हाती धरणाऱ्या , अतिधवल वस्त्र , शुभ्र चंदन आणि शुभ्र पुष्पे यांनी शोभणाऱ्या , विष्णूची प्रियवल्लभा असणाऱ्या ,

सुंदर आणि त्रैलोक्याची समृद्धी करणाऱ्या हे भगवती लक्ष्मी , तू मजवर प्रसन्न हो. “.आपण नारळाचा ‘ श्रीफळ ‘ म्हणून उल्लेख करतो ते चुकीचे आहे. बिल्व वृक्षाचे फळ म्हणजे ‘श्रीफळ ‘ होय. लक्ष्मी ही सर्व प्रकारचे ऐश्वर्य देणारी असल्यामुळे तिची आठ रूपे असल्याचे म्हटले आहे.

(१) धनलक्ष्मी (२) धान्यलक्ष्मी (३) धैर्यलक्ष्मी (४) शौर्यलक्ष्मी (५) विद्यालक्ष्मी (६) कीर्तीलक्ष्मी (७) विजयलक्ष्मी (८) राज्यलक्ष्मी ही आठ रूपे पूजनीय ठरली आहेत. बल आणि उन्माद हे लक्ष्मीचे दोन पुत्र आहेत. परंतु हे पुत्र भावात्मिक असावेत. कारण ज्याच्या घरी लक्ष्मी येते तो बलवान होतो आणि पुष्कळदा

उन्मत्तही होतो असा अनुभव येतो. आनंद, कर्दम, श्रीद आणि चिक्लीत असे लक्ष्मीचे चार पुत्र असल्याचे श्रीसूक्तात म्हटले आहे.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!