Monday, January 17, 2022

नगर ब्रेकींग धक्कादायक ! याठिकाणी बेवारस अवस्थेत आढळला मृतदेह

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: कोरोनामुळे बंद पडलेला व्यवसाय…त्यामुळे खालावलेली आर्थिक परिस्थिती अन त्यातच मुलांनी दुर्लक्ष केल्याने शहरातील वृध्दाचा बेवारस अवस्थेत मृत्यू झाला.

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर बसस्थानकावरील चौकात इस्त्रीचा व्यवसाय करणारे सोमनाथ कुऱ्हाडे यांचा व्यवसाय कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीत बंद पडला. त्यातच अतीक्रमणात असलेली त्यांची टपरी महसूल विभागाने काढून टाकली.

व्यवसायाला जागा राहिली नसल्याने कुऱ्हाडे यांनी घरोघरी जाऊन कपडे गोळा करून इस्त्रीचा व्यवसाय सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र वृध्दावस्थेत ते काम जिकीरीचे होते. त्यामुळे व्यवसाय फारसा होत नव्हता. त्यातून उपासमार होऊ लागल्याने ते कामानिमित्त

कल्याण येथे राहात असलेल्या मुलाकडे गेले. मात्र तेथेही चांगली वागणूक न मिळाल्याने कुऱ्हाडे परत पारनेरला आले.सुपे औद्योगिक वसाहतीत मोलमजुरी करणाऱ्या हंगे येथे वास्तव्यास असलेल्या मुलाकडे राहण्यास गेले. मात्र त्यानेही या वृद्ध पित्याला थारा दिला नाही. त्याने थकलेल्या पित्याला पारनेर बसस्थानकावर आणून सोडले.

उपासमार व वृध्दत्वामुळे गलितगात्र झालेले कुऱ्हाडे दोन दिवस बसस्थानकावरील एका कोपऱ्यात पडून होते. बसस्थानकावर फारशी वर्दळ नसल्याने ही बाब कोणाच्याही लक्षात आली नाही. मात्र तिसऱ्या दिवशी (दि. २६ अ‍ाॅक्टोबर) टाकळी ढोकेश्वर येथील

आनंद सिंधू वृध्दाश्रमाचे संस्थापक विलास महाराज लोंढे यांना पारनेर बसस्थानकावर बेवारस अवस्थेत वृध्द व्यक्ती पडली असल्याचे समजले. त्यांनी तातडीने कुऱ्हाडे यांना पारनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करत मुलांना कळविले. मात्र मुलांनी प्रतिसाद दिला नाही.

कोणीही रुग्णालयाकडे फिरकले नाहीत.गंभीर आजारी असलेल्या कुऱ्हाडे यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात नुकतेच रूजू झालेले डॉ. पवन भावटे यांनी आत्मियतेने उपचार केले. त्यामुळे कुऱ्हाडे यांच्या तब्येतीत सुधारणा झाली. त्यांना जेवण जाऊ लागले.

मात्र उपचारापूर्वी उपासमार झालेली असल्याने त्यांना अतीसाराचा त्रास सुरू झाला. त्यातच उपचार सुरू असताना १ नोव्हेंबर रोजी कुऱ्हाडे यांचा मृत्यू झाला.

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!