भेंडा/नेवासा
नैसर्गिक जलस्रोतांचे संरक्षण करणे, नदीचे पावित्र्य राखणे हे आपणा सर्वांची जबाबदारी आहे. नदी आपली माता आहे,त्यामुळे नदीमध्ये रक्षा-जुनी कपडे-निर्माल्य टाकून तिचे पवित्र नष्ट करू नका. चला नदी नदीला जाणूया या उपक्रमांतर्गत नदी स्वच्छता अभियानामध्ये सेवानिवृत्त जेष्ठ नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जलमित्र सुखदेव फुलारी यांनी केले.
नेवासा तालुक्यातील भेंडा खुर्द येथे रामकृष्ण नवले यांच्या वस्तीवर संजीवन ग्रुपच्या वतीने सेवानिवृत्त जेष्ठ नागरिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्रीसंत ज्ञानेश्वर संस्थांनचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, नागेबाबा पतसंस्थेचे अध्यक्ष कडूभाऊ काळे, तुकाराम मिसाळ, जलमित्र सुखदेव फुलारी, बाबासाहेब महाराज रोडगे, डॉ. अशोकराव ढगे,संजीवन ग्रुपचे अध्यक्ष सुधाकर शिंदे, सचिव रामकृष्ण नवले, रामदास कोरडे प्राचार्य रघुनाथ आगळे,प्रा.परशुराम गणगे आदि व्यासपीठवर उपस्थित होते.
जल व्यवस्थापन व नदी स्वछतेवर बोलताना श्री.फुलारी पुढे म्हणाले की, पाणी झाडे आणि जमिनीचे सुपीकता हे आपल्या दृष्ट्या सर्वात महत्त्वाची घटक आहे.पाणी व्यवस्थापन करण्याची वेळ आली त्यासाठी फक्त मानव कारणीभूत आहे. झाडांची बेसुमार तोड, गावातील ओढे-नाले सपाटीकरण, खोलवर बोर घेण्याची स्पर्धा बेसुमार भुजलो उपसा यामुळे पाणीटंचाई निर्माण होत आहे. पडणारा पाऊस हेच एकमेव पाण्याचे साधन आहे. पाणी फक्त भूगर्भातच सुरक्षित राहू शकते. जमिनीच्या भूगर्भात जिरवलेले आणि त्यामुळे निर्माण झालेला जलसाठा हीच आपली वॉटर बँक आहे.त्यामुळे मला वाटतं की आपल्याला पैशाच्या बँकेपेक्षा आता पाण्याच्या बँकेची गरज आहे.
पैशाने पाण्याचे निर्मिती होत नाही तर पाण्याने पैशाचे निर्मिती होते त्यामुळे भविष्यात ज्याच्याकडे पाणी असेल तोच खरा श्रीमंत समजला जाणार आहे.
सुखी जीवनासाठी अध्यात्म या विषयावर बोलताना गोंडेगाव येथील शनिश्वर मंदिराचे अध्यक्ष बाबासाहेब महाराज रोडगे म्हणाले,विज्ञाना शिवाय भौतिक सुख मिळू शकत नाही हे जरी खरे असले तरी
माणसाच्या अपेक्षा कधी थांबत नाहीत त्यामुळे तो भौतिक सुखाच्या मागे धावत असतो.
विज्ञानाला अध्यात्मची जोड मिळाली नाही तर भौतिक सुखासाठी निर्माण झालेले संसाधने दुबळी ठरू शकतात. आज संस्कार पिढी घराण्याची गरज आहे आई वडील संस्कारी असतील तर मुलही संस्कारी निर्माण होतात.
यावेळी माजी प्राचार्य सुभाष खाटीक,भाऊसाहेब काळे, राम कर्जुले,सुरेश बोगावत, धोंडीराम ढगे,सूर्यभान चिंधे, नामदेवराव उंडे,यशवंतराव एरंडे,पंडितराव खाटीक,सतिश मुळे,सुधाकर शिंदे,अध्यक्ष साहेबराव भणगे,प्राचार्य साहेबराव दहातोंडे,सौ.सुमन कल्हापुरे, जगन्नाथ कल्हापुरे,अशोकराव भवार,पुंजाराम सोनवणे,गोरक्षनाथ कातोरे, दत्तात्रय आघाव,आसाराम कर्डिले, मच्छिंद्र थीटे,डॉ. बाबासाहेब शिरसाठ, रमेश पाडळे,गणेश नवले, मंगेश नवले,नागेश नवले आदि उपस्थित होते.