Friday, December 3, 2021

भाजपचे जिल्हाध्यक्ष मुंढे यांच्यावर गुन्हा दाखल करा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी सोशल मीडियातून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविषयी अनुद्गार काढल्याचा कर्जतमध्ये निषेध करण्यात आला.

शिवसेनेच्या वतीने कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना निवेदन देऊन अरुण मुंढे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली.मुंढे यांना कर्जत तालुक्यात प्रवेश करू देणार नाही.

एवढे करूनही त्यांनी जर प्रवेश केला तर शिवसेना स्टाईल उत्तर देऊन परत पाठवू, असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. बुधवारी सकाळी सर्व शिवसैनिक एकत्र आले व त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष

अरुण मुंढे यांचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर पोलीस निरीक्षक यादव यांना निवेदन देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. तसेच शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविषयी अनुद्गार काढल्याबद्दल त्यांनी तातडीने

माफी मागावी, अन्यथा कर्जत तालुक्यामध्ये त्यांना प्रवेश करू देणार नाही, असा इशारा या निवेदनामध्ये दिला आहे.यावेळी तालुकाप्रमुख बळीराम यादव, सुभाष जाधव, शिवाजी नवले, अक्षय घालमे, रविंद्र खेडकर, अक्षय तोरडमल, पोपट धनवडे, अमोल सुपेकर, पांडुरंग जठार,

अनिल दरेकर ,सागर सुर्वे, दीपक मरळे, किरण सुपेकर, भाऊसाहेब गुंड, शाहीद झारेकरी, बाबा केसकर, दिनेश थोरात, चेतन पवार यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!