Wednesday, December 8, 2021

नगर ब्रेकिंग :बैलगाडीच्या चाकाखाली सापडून मुलाचा मृत्यू

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज:बैलगाडीच्या चाकाखाली सापडून एका बारा वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मोहरी येथे ही घटना घडली असून मृत्यू झालेल्या मुलाचे योगेश सोमनाथ नरोटे असे आहे.

बुधवारी (१० नोव्हेंबर) रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमार हा दुर्देवी अपघात झाला. योगेश त्यांच्या स्वतःच्या मालकीची बैल गाडीतून शेतामधून गुरासाठी चारा घेऊन घराकडे जात होता. मेळवस्ती ह्या त्यांच्या राहत्या घराजवळच योगेश हा बैलगाडीतून खाली पडला.

त्यावेळी डोक्यावरून बैलगाडीचे चाक गेल्याने मोठा रक्तश्राव होऊन त्यात मृत्यू झाला. घटनेनंतर त्याला तत्काळ उपचारासाठी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र योगेशचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

योगेशचे वडिल शेतकरी आणि गरीब कुटुंबातील आहे. या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळल्याने तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे. योगेश हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असून एक मोठी बहिण आहे.

 

तो आदर्श विद्यालयात इयत्ता सातवीत शिकत होता. घरातील आई-वडिलांबरोबर शेतीचे व घरातील छोटे मोठे काम योगेश करत होता.

 

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!