Saturday, November 27, 2021

शेतकऱ्यांनो डीएपी’ खताचा तुटवडा….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पेरणीला सुरवात झाली की, मागणी असलेल्याच डीएपी (18:46:0) खतााचा तुटवडा हे तसे ठरलेले समीकरण आहे. यंदा तर केंद्राकडून मागणीपेक्षा जास्त पुरवठा करुनही स्थानिक पातळीवर खताचा पुरवठाच झालेला नाही.

आता राज्यात सर्वत्रच रब्बी पेरणीची लगबग ही सुरु झाली आहे.मात्र, खत म्हणून ‘डीएपी’ लाच अधिकची मागणी आहे. मात्र, हे खतच बाजारपेठेत उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना इतर खताचा पर्याय निवडावा लागत आहे.

रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा, करडई च्या पेरणीला सुरवात झाली आहे. सध्या पावसाने उघडीप दिली असून मध्यंतरीच्या अवकाळीमुळे पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पण जिल्ह्यात डीएपी खताचाच पुरवठा झालेला नाही. रब्बीत लागणाऱ्या खते तसेच बियाण्यांचे नियोजन करून कृषी

आयुक्तालयाकडे याची मागणी केली आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी एक लाख 55 हजार टन रासायनिक खताचा वापर होतो. तर कृषी विभागाने एक लाख 98 हजार 351 टन खतांची मागणी केली आहे.

शेतकऱ्यांची मानसिकताच झाली आहे की 18:46 या खतानेच पिकाला चांगला उतार येतो. याच मानसिकतेचा फायदा खत विक्रेते घेत आहेत. या खताची कृत्रिम टंचाई निर्माण करुन अधिकच्या दराने त्याची विक्री करतात. मात्र, 18:46 हे खत जरी सहज उपलब्ध नाही झाले तरी

10:26:26, 12:32:16, 15:15, 20:20:00 या खतांचा पर्यांय शेतकऱ्यांकडे आहे. शिवाय मिश्र खतांचा वारर करुनही भरघोस उत्पादन घेता येते. मात्र शेतकऱ्यांनी आपली मानसिकता बदलण्यााची आवश्यकता आहे. अखेर कृषी विद्यापीठाने शिफारस केलेसे

रेशिओ खते आहेत त्यामध्ये नायट्रोजन, फॅास्परस यांचे मिश्रण करुनही वापर करता येत असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.प्रत्येक जिल्ह्याला महिन्याकाठी खताचा पुरवठा हा केला जातो. सप्टेंबर महिन्यातही नांदेड जिल्ह्याला एक हजार सहाशे

टन डीएपी खत मिळाले होते. ऑक्टोबरमध्ये खत आले नाही. त्यामुळे सध्या मागणी असूनही शेतकऱ्यांना ते खत मिळत नाही. मात्र, दोन दिवसांमध्ये डीएपी खताचा पुरवठा होणार असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. रब्बी हंगामातील उत्पादन

वाढावे म्हणून डीएपी खताचीच मागणी केली जाते. पण आता शेतकऱ्यांना वेगळा पर्याय निवडावा लागत आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!