माय महाराष्ट्र न्यूज भेंडा:संत महात्म्यांचे शब्दांमध्ये प्रचंड ताकद असते, त्यांच्याच कृपाशीर्वादाने हाती घेतलेले कार्य पार पडत असतात. समाजाचे दुःख संतांना पाहवत नाही म्हणून ते वेगवेगळ्या रूपात मदतीला धावून येत असतात असे प्रतिपादन
श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांनी केले.नेवासा तालुक्यातील भेंडा येथे श्रीक्षेत्र अध्यक्ष मुख्य हनुमान मंदिरात श्रीराम सेवा मंडळ आयोजित श्रीराम कथेचे औचित्य साधुन स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांनी सदिच्छा भेट दिली,त्यावेळी ते बोलत होते.
ज्ञानेश्वरचे संचालक अशोकराव मिसाळ,माजी पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे,बाजार समितीचे माजी संचालक संतोष मिसाळ,संभाजीराव माळवदे, डॉ लहानु मिसाळ, बाबासाहेब सानप सर, येडूभाऊ सोनवणे,अशोक धुमाळ, बापूसाहेब नजन, समाधान शेलार, किशोर मिसाळ,विजय चौधरी, बंडू अंदुरे , तात्या महाराज शिंदे,शुभम महाराज बनकर, अनिल राशिंनकर व श्रीराम सेवा मंडळाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
स्वामी प्रकाशानंदगिरी पुढे म्हणाले, दुष्काळात संत दामाजीपंतांनी धान्याची कोठारे जनतेसाठी खोली केली. भक्ताच्या जीवनात येणारे दुःख भगवंताला बघवत नाही म्हणूनच दामाजी पंतांच्या रूपाने भगवंतानेच ही मदत केली.
मानवी जीवनातील सर्व प्रश्नांचे उत्तरे राम कथेत आहेत. आदर्शत्वचा सागर म्हणजे राम कथा. आदर्श पिता, आदर्श माता, आदर्श पत्नी,आदर्श भाऊ कसे असावेत याची शिकवण देणाऱ्या रामकथेची आज जगाला खऱ्या अर्थाने गरज आहे. धर्माच्या
कार्यात खारीचा वाटा उचलणाऱ्यांच्या पाठीवर श्रीराम प्रभूचा आशीर्वाद असतो.वाल्मीक लिंगायत यांनी आभार मानले.