Wednesday, December 8, 2021

भारतात कोरोनानं पुन्हा वाढवला टेन्शन, 24 तासात मृतांचा आकडा धक्कादायक

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या दीड वर्षांहून अधिक काळ देश कोरोना महामारीशी झुंज देत आहे. कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं कहर केल्यानंतर देशात कोविड-19 च्या रुग्णांमध्ये सातत्याने घट होत आहे. मात्र गेल्या 24 तासांत समोर आलेली

आकडेवारी भयावह आहे. गेल्या एका दिवसात देशातील 501 रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरी लोकांनी पूर्णपणे सतर्क राहण्याची गरज आहे. मृतांच्या संख्येमुळे सरकारची चिंता वाढली आहे.

यासोबतच गुजरातमध्येही केसेस वाढू लागल्या आहेत.केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात देशात कोरोना व्हायरसचे 12,516 रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर एकूण रुग्णांची संख्या 3,44,14,186 झाली आहे. सक्रिय रुग्णांची

संख्या 1,37,416 वर आली आहे, जी 267 दिवसांतील सर्वात कमी आहे.सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीत असं सांगण्यात आलं आहे की, कोरोना महामारीमुळे गेल्या 24 तासांत 501 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण मृतांची संख्या 4,62,690 वर पोहोचली आहे.

हा सलग 35 वा दिवस आहे, जेव्हा दररोज कोरोनाचे रुग्ण 20 हजारांपेक्षा कमी येत आहेत.मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर नुकसानं झालं होतं. ज्यामध्ये दररोज चार लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत होती.

रुग्णालयातील बेड्स आणि उपचारांच्या समस्येलाही लोकांना सामोरे जावे लागलं होतं.कोरोना व्हायरसचे डेल्टा प्रकार हे चिंतेचे मुख्य कारण राहिलं आहे. INSACOG ने ही माहिती दिली आहे. एका बुलेटिनमध्ये म्हटलं आहे की, जागतिक परिस्थितीमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

B.1.617.2 (AY) आणि AY.x सबलाइन्ससह डेल्टा व्हेरिएंट जागतिक स्तरावर चिंतेचा मुख्य विषय बनला आहे. WHO च्या अपडेटनुसार, डेल्टाने बहुतेक देशांमध्ये इतर प्रकारांना मागं टाकलं आहे आणि आता इतर व्हेरिएंट्स कमी होत आहेत.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!