Friday, December 3, 2021

26 वर्षाच्या तरुणीला जेवण बनवण्यासाठी तिला घरी बोलावून अन् तिच्यावर जबरदस्तीने…..

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पुण्यात एका तरुणाने कंपनीत आपल्या सोबत काम करणाऱ्या तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकाच ठिकाणी नोकरी करत असल्यामुळे झालेल्या ओळखीमधून आरोपीने पीडित तरुणीवर अत्याचार केला आहे.

आरोपीने पीडित तरुणीला जेवण बनवण्याकरिता घरी बोलावून तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहेत.याप्रकरणी २६ वर्षीय पीडित तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. गणेश सुधाकर पारटकर

असे गुन्हा दाखल झालेल्या 26 वर्षीय आरोपीचे नाव आहे. तो थेरगाव या गावातील रहिवासी आहे. आरोपी गणेश आणि पीडित तरुणी एकाच ठिकाणी नोकरीला आहेत.नोकरी करत असताना, दोघांची चांगली मैत्री झाली होती. या ओळखीमधूनच आरोपीने

पीडित तरुणीला जेवण बनवून देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून घेतले होते. याठिकाणी आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले होते. यानंतर आरोपीने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून,

वारंवार घरी आणि रावेत या ठिकाणी असलेल्या लॉजवर नेऊन जबरदस्तीने अत्याचार करत असत.यानंतर पीडित तरुणीने आरोपीकडे लग्नाविषयी विचारणा केली असता. आरोपीने आपण दुसऱ्या एका तरुणीबरोबर लग्न केल्याची माहिती पीडितेला दिली आहे.

हे ऐकून पीडितेला मोठा धक्काच बसला होता. यानंतर आरोपी पीडितेशी परत जबरदस्ती करू लागला. यावेळी पीडितेने मात्र आरोपीला विरोध केला असता, त्याने पीडितेला हाताने मारहाण करत तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले होते.आरोपीने

आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर, पीडित तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी बलात्कारासह फसवणुकीच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!