भेंडा/नेवासा
भेंडा खुर्द येथील श्रीकाल भैरवनाथ यात्रेनिमीत्त उद्या सोमवार दि.३ एप्रिल पासून अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सुरुवात होत आहे.
महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या आशिर्वादाने व रामनाथ महाराज काळेगांवकर यांच्या प्रेरणेने सोमवार दि. ३ ते सोमवार दि. १० एप्रिल दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होत आहे.
दररोज पहाटे ४ ते ६ काकडा आरती, ६ ते ७ भैरव अष्टक, ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते १२ गाथा भजन, १२ ते २ भोजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन, ५ ते ६ हरिपाठ, रात्रौ ७ ते ९ किर्तन तद्नंतर महाप्रसाद ११ ते १ जागर
असा दैनंदिन कार्यक्रम आहे. दि.३ रोजी काशिनाथ महाराज वाडकर,
दररोज सांय.७ ते ९ यावेळेत किर्तन होतील.दि.३ रोजी ज्ञानेश्वर महाराज तांबे,दि.४ रोजी
धनराज महाराज पाटील,दि.५ रोजी अंकुश महाराज कादे,दि.६ रोजी रामनाथ महाराज काळेगांवकर, दि.७ रोजी महंत उद्धवजी महाराज मंडलीक(नेवासेकर),दि.८ रोजी पुजाताई अळकुटे,दि.९ रोजी श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी त्रिवेंद्रानंद सरस्वतीजी महाराज यांची किर्तने होतील.तर
सोमवार दि. १० रोजी सकाळी ८.३० ते १०.३० यावेळेत देवगड संस्थांनचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांचे अमृततुल्य काल्याचे किर्तन होईल. नंतर श्रीसंत नागेबाबा परिवार यांचे वतीने महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.लाभ घेण्याचे आवाहन समस्त भेंडा खुर्द गांवकरी व भजनी मंडळ यांनी केले आहे.
कुस्ती हंगामा व बैलगाडा बैलगाडा शर्यत …
श्रीकाल भैरवनाथ यात्रेनिमीत्त सोमवार दि.१० एप्रिल रोजी
कुस्ती हंगामा व मंगळवार दि.११ एप्रिल रोजी बैलगाडा बैलगाडा शर्यती आयोजित करण्यात आल्याची माहिती सोपान राव महापुर व वैभव नवले यांनी दिली.