Friday, December 3, 2021

आता वेगन कंडोम, सुरक्षित कुटुंबनियोजनासाठी नवा पर्याय! या महिलेचे अनोखे व शास्त्रीय संशोधन

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कंडोम हा आपल्याकडे काहीसा कानात बोलायचा विषय. महिलांसाठी तर याविषयावर बोलणे म्हणजे पाप असल्यासारखेच. पण एक २६ वर्षीय तरुणी या विषयावर केवळ बोलत नाही तर एक अनोखे संशोधन करते आणि आपली ही

आगळीवेगळी कल्पना बाजारात आणत तिचे महत्त्वही पटवून देते. आता अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे या तरुणीचे कौतुक केले जात आहे, तर सुरक्षित कुटुंबनियोजनासाठी आवश्यक असलेल्या कंडोमचा वेगन पर्याय तिने बाजारात आणला आहे.

सध्या वेगन डाएट, वेगन फूड या गोष्टींचे बरेच फॅड असताना वेगन कंडोम ही अनोखी कल्पना तिने बाजारात दाखल केली आहे. या तरुणीचे नाव आहे अरुणा चावला. कंडोम हा केवळ पुरुषांना शारीरिक संबंधादरम्यान आनंद मिळावा यासाठी नसून जोडीदारांपैकी दोघांसाठीही

तो महत्त्वाचा असतो. शारीरिक संबंधांमध्ये अश्लिल दृष्टीने पाहणे योग्य नसून आरोग्याच्या दृष्टीनेही कंडोमचे महत्त्व असायला हवे असे अरुणा यांचे म्हणणे आहे. एड्ससारख्या आजाराचे वाढते प्रमाण आणि लॉकडाऊनच्या काळात नको असताना गर्भधारणा झालेल्या महिलांची संख्या यांमुळे कंडोमसारख्या

गर्भनिरोधक साधनाचे महत्त्व वाढले आहे. कंडोम हा गर्भनिरोधक म्हणून सर्वात सोपा आणि स्वस्त पर्याय असूनही भारतात तो वापरण्याचे किंवा त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन फारच वेगळा आहे. आजही भारतात केवळ ५.६ टक्के लोक गर्भनिरोधक म्हणून

कंडोमचा वापर करताना दिसतात. पण एड्सच्या रुग्णांचे प्रमाण आणि गर्भधारणा होण्यावर नियंत्रण आणायचे असेल तर कंडोमचे गांभिर्य लक्षात घ्यायला हवे. दिल्लीमध्ये स्थायिक असलेल्या, कला आणि फॅशन कायदा विषयात काम करत असलेल्या अरुणा यांनी

हाच मुद्दा लक्षात घेऊन आपले काम सुरू केले. ‘द बेटर इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत अरुणा यांनी आपल्या संशोधनाबाबत आणि या नव्या प्रकारच्या कंडोमबाबत बऱ्याच गोष्टी सांगितल्या.कंडोममुळे महिलांच्या शरीरात नेमके कोणते घटक जातात

याबाबत आपल्याकडे अजिबात ज्ञान नसते. त्यावर ब्रँड, किंमत, फ्लेवर हे सगळे दिलेले असते पण त्यातील घटकांविषयी कोणतीही माहिती नसते. त्यामुळे आमच्या कंडोममध्ये नेमके कोणते घटक आहेत हे आम्ही आवर्जून नमूद केले आहे.

क्यूआर कोड स्कॅन केल्यावर ग्राहकांना कंडोममध्ये वापरण्यात आलेले घटक, त्यांचे शरीराला होणारे फायदे यांविषयी देण्यात आले आहे. अनेकदा कंडोममध्ये प्लास्टीकसारखा घटक किंवा प्राण्यांशी निगडीत पदार्थांचा वापर केलेला असतो. पण भारत हा विविध जाती-धर्म असलेला

देश असल्याने या देशात शाकाहारी लोकांचे प्रमाणही जास्त आहे. केवळ मार्केटींग किंवा लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही वेगन असे म्हणत नसून आम्ही खऱ्या अर्थाने त्या पद्धतीचे पदार्थ हा कंडोम तयार करण्यासाठी वापरले असल्याचे अरुणा सांगतात.

आपल्या कंपनीच्या एकूण उत्पन्नाच्या १५ टक्के भाग हा देशातील शाळा महाविद्यालयांमध्ये लैंगिक संबंधांविषयी शिक्षण देण्यासाठी वापरण्यात येत असल्याचेही त्या म्हणाल्या.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!