नेवासा/प्रतिनिधी
पिढ्यान पिढ्या ज्या पक्षा बरोबर राहिल्या त्या पक्षालाच अडचणीत आणायचे नाही म्हणून निवडणूक काळामध्ये मी काही बोललो नाही.मात्र आपल्या इकडे तिकडे कुठे ही शाखा नाही हे स्पष्ट करतांनाच अपक्ष असण्याचा किती आनंद आहे तो विषयच वेगळा आहे अशी मिस्कील टिप्पणी नाशिक पदवीधर विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी केली.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात आमदार तांबे बोलत होते कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष जाणीव होते कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष काशीनाथ नवले, संचालक काकासाहेब शिंदे,प्रा. नारायण म्हस्के, दादासाहेब गंडाळ,अशोकराव मिसाळ, शिवाजीराव कोलते, ,सखाराम लव्हाळे,दीपक नन्नवरे,शंकरराव पावसे,डॉ.शिवाजी शिंदे,गणेश गव्हाणे, डॉ.अशोकराव ढगे ,कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सचिव रविंद्र मोटे व्यासपीठावर उपस्थित होते.
आमदार सत्यजित तांबे पुढे म्हणाले, निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्यक्ष गाठीभेटी घेता आले नाही म्हणून आपले आभार मानण्यासाठी मी आज आलो आहे. नाशिक पदवीधर हा ५४ तालुक्याचा मतदार संघ आहे. संपूर्ण मतदारसंघात आभार दौरा करायचा म्हटला तरी पाच सहा महिन्याचे कालावधी लागेल.नगर जिल्ह्यामध्ये मारुतराव घुले पाटील, भाऊसाहेब थोरात, आबासाहेब निंबाळकर, शंकरराव काळे, अण्णासाहेब शिंदे या नेते मंडळींनी एकत्र राहून जिल्ह्याचे राजकारण,सहकारी संस्था व जिल्हा बँक यांचे माध्यमातून लोकांचा विकास केला. म्हणूनच आज उभा असलेला नगर जिल्हा आपल्याला दिसत आहे. या मंडळींनी बँकेला एक वेगळीच शिस्त लावलेली आहे,त्यामुळेच राज्यात जिल्हा बँक अग्रेसर आहे. मात्र पुढे काय होईल हे आपल्याला माहीत नाही.
आपल्या पिढ्यानपिढ्या ज्या पक्ष बरोबर राहिल्या त्या पक्षालाच अडचणीत आणायचे नाही म्हणून निवडणूक काळामध्ये मी काही बोललो नाही.माझ्या वडिलांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाशी घनिष्ट व जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केल्याने अडचणीत असतानाही सर्वांनी भरभरून मदत केली हे मी कधी विसरणार नाही.
माझे आजोबा भाऊसाहेब थोरात यांनी आम्हाला राजकारणाचा आणि पदाचा उपयोग सर्वसाधारण माणसाच्या फायद्यासाठी करा अशी शिकवण आम्हाला दिलेली आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असावा लागणारा खंबीर लोकप्रतिनिधी होण्याचा प्रयत्न मी करेल. मारुतराव घुले पाटील व भाऊसाहेब भाऊसाहेब थोरात यांच्यापासून घुले व थोरात परिवारामध्ये असलेले तीन पिढ्याचे ऋणानुबंध यापुढेही असेच जपण्याचा प्रयत्न मी करील अशी ग्वाही आमदार तांबे यांनी दिले.
यावेळी वसंतराव देशमुख, बाळासाहेब नवले, नामदेव निकम,दादासाहेब गजरे,अंबादास गोंडे,प्राचार्य भारत वाबळे,रामकृष्ण नवले, सुरेश आहेर,नंदकुमार पाटील,कारभारी गायके,कल्याण म्हस्के,कामगार संचालक संभाजी माळवदे,शिक्षक सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब आरगडे,उपसरपंच सागर महापुर,वैभव नवले, डॉ.महेशराजे देशमुख, अरविंद सरोदे, डॉ.लहानु मिसाळ,प्राचार्य डॉ.रामकिसन सासवडे, प्रा.शिरीष लांडगे, गुलाबराव आढ़ागळे, सुनील वांढेकर, भारत साबळे, देवेंद्र काळे, पावसे,परशुराम वाघ,सतीष शिंदे,विलास देशमुख आदि उपस्थित होते.
गणेश गव्हाणे यांनी स्वागत केले.
भाऊसाहेब सावंत यांनी प्रस्ताविक केले.
तुम्हाला विचारल्या शिवाय निर्णय घेणार नाही…
यावेळी बोलताना माजी आमदार पांडुरंग अभंग म्हणाले मामाला आणि तांबे साहेबांना खाली पहाण्याची वेळ येणार नाही याची काळजी घ्या असा सल्ला आमदार सत्यजित तांबे यांना दिला.
यावर ठीक आहे तुम्हाला विचारल्याशिवाय निर्णय घेणार नाही अशी टिप्पणी आ. तांबे यांनी केली.अंभग-तांबे यांच्या या शब्द कोटीने उपस्थितां मध्ये एकच आशा पिकला.