Saturday, November 27, 2021

ब्रेकिंग: नगरमध्ये एस टी वाहकाचा मृत्यू

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. एसटी महामंडळ बरखास्त करून राज्य सरकारमध्ये विलनीकरण करण्यात यावे, ही कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. मुंबई हायकोर्टाच्या

आदेशान्वये राज्य सरकारने समिती नेमली आहे. तरी देखील ठोस तोडगा न निघाल्याने एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. संप मागे घ्या, अन्यथा कारवाई, असा इशारा परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिला आहे.

दरम्यान नगरमध्ये ५ ते ६ दिवसांपासून घरीच उपोषणास बसलेल्या एका एसटी कर्मचार्‍याचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. विजय महादेव राठोड (वय 46 रा. बुर्‍हाणनगर ता. नगर, मुळ रा. वांगुज ता. आष्टी जि. बीड) असे मयत  कर्मचार्‍याचे नाव आहे.

विजय राठोड हे कल्याण आगारात वाहक म्हणून कार्यरत होते.एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी सध्या राज्यभर संप सुरू आहे. राठोडही या संपात सहभागी झाले होते. त्यांनी नगर शहरातील तारकपूर  येथील

संपात सहभाग घेतला होता. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून ते उपाशी होते. रविवारी ते नगर जवळील मिरावली पहाड येथे दर्शनासाठी गेले होते. तेथे त्यांना त्रास होऊ लागल्याने जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!