Friday, December 3, 2021

अनेक वर्षे कट्टर विरोधक:पण या फोटोंने नगर जिल्ह्यातील राजकारण पुन्हा मोठी घडामोड

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अनेक वर्षे कट्टर विरोधक म्हणून भूमिका बजावलेले मुरकुटे पिता-पुत्र व शिवसेनेचे खा. सदाशिव लोखंडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी काल उपनगराध्यक्ष व जिल्हा बँकेेचे संचालक करण ससाणे यांनी काँग्रेसच्यावतीने आयोजित

केलेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमाला हजेरी लावली. एवढेच नव्हे तर दोघांनीही फराळाचा आस्वाद घेतला. गेल्या एक ते दीड वर्षापासून ससाणे-मुरकुटे यांच्यातील संघर्ष हळूहळू मावळताना पहायला मिळत आहे. आगाशे कट्ट्यावर ससाणे-समर्थकांमधील मैत्रीचा धागा बांधला गेला.

त्यानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपनगराध्यक्ष करण ससाणे व माजी आ. भानुदास मुरकुटे या दोघांनाही बिनविरोध संचालक करण्यात महत्वाची भूमिका बजावून या नव्या मैत्रीची रेशिमगाठ बांधली.

त्यावेळीही मुरकुटे व ससाणे यांनी एकमेकांना पेढा भरवला. त्या पेढ्याची गोडी अजूनही टिकून असल्याचा अनुभव काल दिवाळी फराळाच्या निमित्ताने आला.काल सकाळी माजी आ. भानुदास मुरकुटे व त्यांचे नातू निरज सिध्दार्थ मुरकुटे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. एवढेच नव्हे तर काँग्रेसचे आ. लहू कानडे

यांच्यासोबत येणार्‍यांचे स्वागत करण्यासही काही वेळ माजी आ. मुरकुटे उभे राहिले. दुपारी मुळा-प्रवराचे संचालक सिध्दार्थ मुरकुटे आपल्या कार्यकर्त्यांसह सुयोग मंगल कार्यालयातील फराळाच्या कार्यक्रमास उपस्थित राहिले. करण ससाणे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

ससाणे यांच्या या दिवाळी फराळ कार्यक्रमाला शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनीही हजेरी लावली. माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या समवेत त्यांनीही फराळाचा आस्वाद घेतला. माजी आमदार भानुदास मुरकुटे व खा. सदाशिव लोखंडे यांच्या

दिवाळी फराळ कार्यक्रमाच्या हजेरीची काल दिवसभर शहरात खमंग चर्चा सुरु होती. त्यांचे फोटोही सोशल मिडीयावर फिरत होते.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!