Saturday, November 27, 2021

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना कामगारांना नोव्हेंबरच्या पगारत 12 टक्के वेतनवाढ-नरेंद्र घुले पाटील

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/Newasa

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना कामगारांना नोव्हेंबर 2021 पगारात 12 टक्के वेतनवाढ लागू करण्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी केली.

मंगळवार दि.16 नोव्हेंबर रोजी लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळची सभा अध्यक्ष श्री.नरेंद्र घुले पाटील यांचे अध्यक्षतेखाली व संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत झाली.महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश आदिक व सरचिटणीस नितीन पवार यांनी जेष्ठ नेते खा.शरद पवार व राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्याने राज्यातील साखर कामगारांना 12 टक्के वेतनवाढ लागू करण्याचा त्रिपक्षीय समितीने करार केला व राज्य शासनाच्या कामगार विभागाने शासननिर्णय निर्गमित केला आहे. त्यानुसार 1 एप्रिल 2019 पासून साखर कामगारांना 12 टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णय ऑक्टोबर 2021 मध्ये झालेला आहे.या निर्णयाची अंमलबजावणी करीत ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे कामगारांना नोव्हेंबर 2021 च्या पगारात 12 टक्के वेतन वाढ देण्याचा निर्णय संचालक मंडळाचे सभेत श्री.घुले यांनी जाहीर केला.

यावेळी उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग,जेष्ठ संचालक अड.देसाई देशमुख,विठ्ठलराव लंघे,काकासाहेब नरवडे,काशीनाथ नवले,काकासाहेब शिंदे, पंडितराव भोसले,डॉ.नारायणराव म्हस्के,भाऊसाहेब कांगुणे,जनार्दन कदम, बबनराव भुसारी,दीपक नन्नवरे, शंकरराव पावसे,सखाराम लव्हाळे,विष्णूपंत जगदाळे,कार्यकारी संचालक अनिल शेवाळे,सचिव रवींद्र मोटे आदी उपस्थित होते.
संचालक मंडळाने 12 टक्के वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष व कामगार संचालक सुखदेव फुलारी यांनी व्यवस्थापनाचे आभार मानले.

 

 

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!