Friday, December 3, 2021

महाविकास आघाडी म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात भ्रष्ट सरकार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाविकास आघाडी सरकारची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून केली जाईल हा माझा दावा आहे असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं आहे.महाविकास आघाडी सरकारच्या काळात ज्या प्रकारचा अनाचार, दुराचार आणि भ्रष्टाचार

पाहण्यास मिळाला त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणजे हे सरकार आहे हे दिसतं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आता एल्गार पुकारून रस्त्यावर उतरावंच लागणार आहे, आता कोरोनाचं कारण देऊन आम्हाला

सरकार रोखू शकत नाही असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला. मुंबईत झालेल्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी ही घणाघाती टीका केली.ठाकरे सरकारच्या काळात हजारो कोटींची लूट सुरू आहे. कायद्याचं राज्य नाही तर काय देता ते बोला असं सध्या राज्यात सुरू आहे.

त्यामुळे सरकारच्या विरोधात एल्गार पुकारावाच लागेल असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज सुधीर मुनगंटीवार यांनी जो प्रस्ताव मांडला त्यात या सरकारचे कपडे काढले. पण हे सरकार निर्लज्ज आहे त्यांचे कितीही कपडे काढले तरीही त्यांना फरक पडत नाही असाही टोला फडणवीस यांनी लगावला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
केवळ माजी गृहमंत्री जेलमध्ये आहेत. एवढ्यावर हे सिमीत नाही. प्रत्येक विभागात वाझे आहेत. एक एक आकडा बघितला तर मन थक्क होईल. नुकत्याच काही धाडी पडल्या त्यात हजार कोटी,

पाचशे कोटी, चारशे कोटीची दलाली उघड झाली. पण सामान्य शेतकऱ्यांकडे मात्र वळून पाहायला कुणी तयार नाही. देशद्रोह्यांसोबत भागिदारी करत आहेत. त्यांच्या जमिनी तुम्ही घेत आहात. आज जिल्ह्या जिल्ह्यात मंत्री, आमदार, खासदारांचं अवैध रेती, अवैध दारूचं नेक्सस सुरु आहे. महाराष्ट्रात यापूर्वी अशी अवस्था

कधीही पाहिली नव्हती. पुढे कुणाचंही राज्य आलं तर महाराष्ट्राला पूर्व पदावर आणण्यासाठी खूप काळ लागेल. कोटी कोटी रुपये देऊन पोलीस अधिकारी त्या पदावर येत असतील तर आम्ही त्यांना काय आवाहन करणार की भ्रष्टाचार थांबवा, अशी खंतही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!