Friday, December 3, 2021

महाराष्ट्रातील घटना:9 महिन्यांपासून पोटात वाढत होतं बाळ अन् महिलेला काहीच माहिती नाही

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर मूलबाळ व्हावं, असं प्रत्येक दाम्पत्याचं स्वप्न असतं. पण आई बनणं प्रत्येकाच्या नशिबात नसतं. पण नागपुरातील एका दाम्पत्यासोबत विचित्र घटना घडली आहे. येथील एका दाम्पत्याला लग्न झाल्यानंतर तब्बल 17 वर्षे मूलबाळ झालं नाही.

अनेक प्रकारचे उपचार घेऊनही पदरी निराशा आली. पण लग्नाच्या सतरा वर्षानंतर त्यांना सरप्राइज मिळालं आहे. गर्भधारणा होऊन नऊ महिने झाल्यानंतरही महिलेला आपण गर्भवती असल्याचा थांगपत्ता नव्हता. पण पोटात दुखू लागल्यानंतर

त्या रुग्णालयात दाखल झाल्या, त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.गर्भधारणा होऊन नऊ महिने झाल्याची माहिती डॉक्टरांकडून दिल्यानंतर, संबंधित दाम्पत्याला विश्वासच बसला नाही. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांना पुन्हा एकदा तपासणी करण्यास सांगितलं.

दुसऱ्या तपासणीतही संबंधित महिला गर्भवती असल्याचं समोर आलं आहे. या विचित्र प्रकार पाहून डॉक्टरही हैराण झाले आहेत. यानंतर संबंधित महिलेनं एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. संबंधित घटना नागपुरातील एम्स रुग्णालयात घडली आहे.

गर्भधारणा होऊन नऊ महिन्यानंतरही पोटात बाळ वाढत असल्याची माहिती महिलेला नव्हती, हे पाहून रुग्णालयात सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विशेष म्हणजे संबंधित 47 वर्षीय महिलेला दीर्घकालीन उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास आहे.

याच्या गोळ्याही सुरू होत्या. अशा गोळ्या पोटातील बाळासाठी हानिकारक असतात. पण या घटनेत मात्र तसं काहीच झालं नाही. निरोगी बाळ जन्माला आल्याने डॉक्टर देखील हैराण झाले आहेत.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!