Friday, December 3, 2021

आता श्री.साईबाबा दर्शनासाठी इतक्या हजार ऑफलाईन पासेस

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : कोरोना निर्बंधामुळे शिर्डी येथील श्री.साईबाबा दर्शनासाठी दररोज १० हजार ऑफलाईन प्रवेश पासेसचे वितरण करण्यात येणार असल्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी घेतला आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन चे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ५ ऑक्टोंबर २०२१ शिर्डी येथे बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत अहमदनगर येथील कोरोना वाढती रूग्णसंख्या पाहता धार्मिक स्थळांवर व प्रार्थनास्थळांवर

कोरोना नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.या निर्णयानुसार ६ ऑक्टोंबर २०२१ पासून श्री.साईबाबा संस्थांमधील सर्व १५ हजार पासेस ऑनलाईन देण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र आता

अलीकडच्या काळात अहमदनगरमधील कोरोना रूग्णसंख्या कमी होत असल्यामुळे शिर्डी येथील श्री.साईबाबा संस्थान कडून ऑफलाईन पासेस वितरणाची परवानगी देण्यात यावी. असा प्रस्ताव जिल्हा आपत्ती व्यवस्थापनास पाठविण्यात आला होता.

या प्रस्तावावर आज अहमदनगर येथे झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी निर्णय घेत आता दररोज १० हजार ऑफलाईन पासेस वितरणाला परवानगी दिलेली आहे. मात्र कोविड नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी श्री.साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्राद्वारे कळविला आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!