Friday, December 3, 2021

या काँगेसच्या मंत्र्यांचे विधान:एखाद्या नाचीनं महात्मा गांधींवर बोलणं म्हणजे…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या महात्मा गांधींबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहे. कंगनाच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरु आहेत. ‘सुभाष चंद्र बोस आणि भगत सिंह यांना महात्मा गांधींनी पाठिंबा दिला नाही.

त्यापुढे ती म्हणाली की, दुसरा गाल पुढे केल्याने स्वातंत्र्य मिळत नाही तर भीक मिळते. खरे स्वातंत्र्य तर 2014 मध्ये नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर मिळाले’, असं कंगना आपल्या पोस्टमध्ये म्हणाली आहे. त्यावर आता मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कंगना रणौतला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

देशाचे स्वातंत्र्य आणि महात्मा गांधींवर वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतला काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चांगलंच फटकारलं आहे. महात्मा गांधींवर भाष्य करण्याची कंगना रनौतची लायकी तरी आहे का, असा सवाल त्यांनी केला. एखादी नाची महात्मा गांधींवर बोलतेय. आज कंगना रनौतबद्दल लोक

काय बोलतात हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे कंगना रनौतनं महात्मा गांधींवर बोलणं म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखं आहे. अशा शब्दात मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कंगना रनौतचा समाचार घेतला. मात्र कंगनावर अशा शब्दात केलेली टिप्पणी मंत्री वडेट्टीवार यांना भोवण्याची शक्यता आहे.

बॉलीवूड क्वीन कंगना रनौत सध्या महात्मा गांधींबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहे. कंगनाच्या या वक्तव्यामुळे राजकीय हालचाली सुरु असल्याचे बोलले जात आहे. कंपनाने मंगळवारी एका वक्तव्यात म्हटले की, सुभाष चंद्र बोस आणि भगत सिंह यांना महात्मा गांधींनी पाठिंबा दिला नाही. त्यापुढे ती म्हणाली

की, दुसरा गाल पुढे केल्याने स्वातंत्र्य मिळत नाही तर भीक मिळते. खरे स्वातंत्र्य तर 2014 मध्ये नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर मिळाले. इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे कंगना रनौत सध्या चर्चेत आहे.

दादर येथील शिवाजी पार्कवर आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर भेट दिल्यानंतर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काही प्रतिक्रिया दिल्या. साहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट दिल्यावर एक वेगळीच शक्ती आणि ऊर्जा मिळते. याठिकाणी आल्यावर जुन्या आठवणींना उजाळा मिळतो, अशा भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!