नेवासा
नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील नळ पाणी योजनेच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली असून हे काम एप्रिल 20 24 पर्यंत पूर्णत्वास येईल असे आमदार शंकराव गडाख यांनी सांगितले.
नेवासा तालुक्यात आमदार शंकरराव गडाख यांनी मंजूर केलेल्या विविध विकास कामांचा धडाका सुरू असून तालुक्यातील घोडेगाव येथील जल जीवन मिशन कार्यक्रम योजनेअंतर्गत 2022-23 मध्ये नळ पाणीपुरवठा योजना मंजूर झाली या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी तब्बल 48.83 कोटी रुपये आमदार शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नातून मिळाले आहे. या योजनेच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे.
नळ पाणीपुरवठा योजनेच्या पाहणी दौऱ्या दरम्यान आ. शंकरराव गडाख यांनी ग्रामस्थ व ठेकेदार यांची एकत्रित बैठक घेऊन गावातील पाण्यासंबंधीच्या प्रत्येक समस्येवर जागेवरच तोडगा काढला. लवकरात लवकर या नळ पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होऊन एका वर्षातच घोडेगावकरांना स्वच्छ पाणी पिण्यास मिळणार आहे. पाणी योजनेचे काम गुणवत्तापूर्ण पद्धतीने करण्याच्या सूचना आ. शंकरराव गडाख यांनी ठेकेदार यांना दिल्या आहेत तसेच पाणी टॅंक मधील पाणी स्वच्छ रहावे म्हणून टॅंक च्या आजूबाजूला वृक्षारोपण करण्याच्या सूचनाही आमदार शंकराव गडाख यांनी संबंधित ठेकेदाराला दिल्या.
ग्रामस्थ आणि ठेकेदार यांच्यामध्ये कामाविषयी जो संभ्रम होता तो जागेवरच दूर करून प्रत्यक्षात या कामाला सुरुवातही झाली आहे. तब्बल एक वर्षांपूर्वी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी नेवासा तालुक्यातील अनेक गावांमधील पाणीपुरवठा योजनेच्या वर्क ऑर्डर आमदार शंकरराव गडाख यांच्याकडे सुपुर्द केल्या होत्या .यात घोडेगाव नळ पाणीपुरवठा योजनेच्या वर्क ऑर्डरचाही समावेश होता.त्यामुळे नेवासा तालुक्यात आमदार शंकरराव गडाख यांच्याच विकास कामांची चर्चा होताना दिसत आहे
*नळ पाणीपुरवठा योजना अनेक गावांना लाभदायी ठरणार आहे. योजनेची वैशिष्ट्ये….
* दैनंदिन माणसी ५५ लिटर पाणी दिले जाणार आहे.
* योजना सन 2053 सालापर्यंत गृहीत धरून केली आहे.
*या गावची वाड्या-वस्त्यासह सध्याची लोकसंख्या १३२६१ आहे.
योजनेमध्ये झिने वस्ती / मोहिते वस्ती / कदम वस्ती (सोनई रोड) / चेमटे वस्ती / कदम वस्ती (चांदा रोड) इ. वस्त्यांचा समावेश आहे.
* गावात ५ लाख १५ हजार लिटरची मुख्य टाकी असून या सर्व वस्त्यांवर नविन टाक्या बांधण्याल येणार आहे व त्यामध्ये मुख्य टाकीतून पाणी येणार आहे तसेच पाण्याचा शास्वत उदभव मुळा कॅनॉल आहे.
* कॉलनीत ८.७ कोटी लिटर पाण्याचा साठवण तलाव बांधला जाणार असून किमान दिड महिना पाणी पुरेल असे नियोजन आहे.
* याच ठिकाणी ३० लाख लिटर क्षमतेचे जलशुध्दी करण केंद्र बांधण्यात येणार आहे.
* गावांतर्गत ४७ कि.मी. ची वितरण व्यवस्थाही करणेत येणार आहे.
* गावठाणमध्ये जुनीच १ लाख लिटर क्षमतेची टाकी वापरली जाणार आहे.