Saturday, November 27, 2021

नगर जिल्ह्यात व्हाईटनर नशेच्या जीवघेण्या व्यसनांमध्ये तरुणाई अडकल्याचे भयानक वास्तव समोर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:तंबाखू, सिगारेट, गुटखा, मद्यपान करणार्‍यांना व्यसन लागले असा आपल्याकडे सहज समत आहे. अशांची संख्या प्रामुख्याने मोठी आहे. दरम्यान मोठ्या शहरा पाठोपाठ आता राहाता शहरासह तालुक्याच्या ग्रामीण

भागातही व्हाईटनर नशेच्या जीवघेण्या व्यसनांमध्ये तरुणाई अडकल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे. व्हाईटनरच्या या नशेमध्ये 14 ते 18 वर्षाच्या अनेक मुलांच्या आरोग्याची दुर्दशा होत असल्याने पालकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

सध्या राहाता परिसरात शाही खोडण्यासाठी वापरण्यात येणारे व्हाईटनर रुमालवर टाकून त्याचा गंध घेऊन नशा करणारे तरुण परिसरात मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळत आहेत. प्रामुख्याने 16 ते 25 वयोगटातील तरुणांना हे व्यसन लागले आहे.

राहाता तालुक्यात शिर्डी आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे तसेच तालुक्यात बांधकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे.परप्रांतीय तरुण रोजगारासाठी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर येतात. त्यांच्या संगतीत राहून येथील तरुणांनी अनेक व्यसने लावून घेतली आहेत.

यामध्ये व्हाईटनरची नशा सध्या चर्चेचा व तितकाच गंभीर विषय बनला आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक विद्यार्थी शाळेत न जाता हे व्यसन करतात. हल्ली जनरल स्टोअर्समध्ये व्हाईटनरची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.

काही वर्षांपूर्वी कोरॅक्स, आयोडेक्स औषध सेवन करून तरुण वर्ग व्यसनाधीन झाला होता. व्हाईटनर रुमालावर टाकून त्याचा गंध घेऊन व्यसनाचा फंडा परिसरात तरुणांच्या हाती लागला आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!