Tuesday, November 30, 2021

नगर जिल्ह्यात याठिकाणी पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगरमध्ये पोलिसांवर हल्ले होण्याच्या घटना बऱ्याचदा घडलेल्या आहेत. आता आणखी एक धक्कादायक घटना घडली.

नगर तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसास जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. अधिक माहिती अशी : नगर तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी भरत बाजीराव धुमाळ हे पसार आरोपीला पकडण्यासाठी गेले होते.

हे पसार आरोपी रमेश भोसले याला अटक करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे असलेल्या सात जणांनी धुमाळ यांना पकडून लाकडी दांडके, दगड, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

धुमाळ यांच्या दुचाकीचे नुकसान केले आहे. सदर घटना नगर तालुक्यातील कारगाव चौकात घडली.या हल्ल्यात नगर तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी भरत बाजीराव धुमाळ हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

त्यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून हल्ला करणारे रमेश सावत्या भोसले, तुषार सावत्या भोसले, आत्मशा सावत्या भोसले, सावत्या भोसले, अविनाश ऊर्फ सुरशा भोसले,

शेरीना रमेश भोसले व एक अनोळखी (सर्व रा. पिंपळगाव कौंडा ता. नगर) यांच्यावर खूनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करत आहेत. पोलिसांवरील हल्ले ही चिंताजनक बाब असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!