Friday, December 3, 2021

अनिल देशमुख यांना उद्धव ठाकरे व शरद पवार यांनीच जेलमध्ये टाकले

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्राला लुटण्याचे कारस्थान ठाकरे- पवार सरकारकडून करण्यात येत आहे, सरकारचा गृहमंत्री वसूली प्रकरणामुळे जेलमध्ये जातो यामुळे नेत्यांची मान शरमेने खाली जाण्याऐवजी या उलट ते धमकी देत आहेत. ही धमकी ईडीला,

सर्वोच्च न्यायालयाला की भाजपला देता? असा सवाल करत अनिल देशमुख यांना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनीच जेलमध्ये टाकले असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला.

यावेळी सोमय्या म्हणाले की, ठाकरे सरकार घोटाळे तसेच घोटाळेबाजांवर काहीही बोलत नाही, मी केलेल्या आरोपांचा एकही कागद खोटा आहे हे त्यांनी सिद्ध करुन दाखवावे. देशमुख यांचे जेवढे क्षण जेलमध्ये जात आहेत त्याची किंमत मोजावी

लागणार असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. ही धमकी कुणाला देता ? असा सवाल त्यांनी केला.ठाकरे सरकारचे २३ लोक ज्यात राज्याचे मंत्री, अधिकाऱ्यांचा समावेश आहे अशा लोकांवर चौकशी सुरु आहे. यामध्ये अनिल परब, हसन मुश्रीफ, भावना गवळी आदींची

नावे यावेळी सोमय्या यांनी घेतली. पत्रकार परिषदेत अर्जून खोतकर यांनी शंभर कोटींचा घोटाळा केला असून त्याचे पुरावे, तक्रार आयकर विभाग, सहकार खाते, सहकार मंत्रालयाकडे दिली असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले.

घोटाळा कुणाचाही असो तो घोटाळाच असतो असे म्हणत ठाकरे सरकारच्या कालावधीत ज्या लोकांनी सरकारी, राजकीय पदाचा दुरुपयोग करुन गोरगरीब जनता तसेच शेतकऱ्यांना लुटले अशा लोकांवर कारवाई व्हायलाच हवी असेही सोमय्या यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!