Friday, December 3, 2021

महसूलमंत्री थोरातांचा सवाल अगोदर टाळ्या-थाळ्या वाजवणारे कुठे गेले आहेत?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार ठराविक लोकांसाठी कायदे तयार करण्याचे काम करत असल्याची टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. केंद्र सरकारने तीन शेतकरी कायदे मागे घेतल्याने शेतकरी विजय दिवस संगमनेरच्या तळेगाव येथे

फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला या वेळी बाळासाहेब थोरात बोलत होते.आमदार सुधीर तांबे सह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे थोरात म्हणाले आता पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहे. आता अगोदर टाळ्या-थाळ्या वाजवणारे कुठे गेले आहेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

यावेळी बोलताना थोरात यांनी कंगना राणावतवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, आता एक नवीन नटी आली आहे, तिची स्वातंत्र्याबद्दल बोलण्याची लायकी आहे का? कंगणाचे बोलणे चुकीचे असून ती वादग्रस्त बोलते. स्वातंत्र्य मिळण्यासाठी हजारोंचे बळी गेले आहेत.

ही बोलते आणि तिला संरक्षण मिळते आणि लगेच पद्मश्री मिळतो.आज ती स्वातंत्र्यावर बोललीय उद्या राज्यघटनेवर बोलले जे असे वादग्रस्त बोलतात त्यांना लगेच पद्मश्री मिळतो. अश्याच प्रकारचे विधान विक्रम गोखले यांनी केले आहे.

आता त्यांनाही पद्मश्री मिळेल, अशी टिपण्णी यावेळी थोरात यांनी अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर केली आहे.मात्र, अशाप्रकारचे बोलणे सहज नसते, कोणीतरी यामागे असते. हे आता राज्यघटनेकडे देखील वळतील आणि राज्य घटना बोगस आहे म्हणतील.

देश राज्य घटनेप्रमाणेच चालला पाहिजे हे आपण सर्वांनी लक्ष्यात ठेवले पाहिजे. सर्व संत विचाराचा सार डॉ. बाबासाहेबांनी केला अन राज्यघटना तयार केली आहे असं ही थोरात म्हणाले.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!