Saturday, November 27, 2021

२८८ आमदारांमध्ये नीलेश लंके नंबर १ – उपमुख्यमंत्री अजित पवार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:करोना संकटात जगाला काही लोक माहीती झाले, त्यात तुमच्या पारनेरचाही आमदार आहे ! नीलेशच्या रूपाने तुम्हाला चांगले नेतृत्व मिळाले आहे. करोना काळात हा गडी रूग्णांमध्ये जाऊन ऐटीत बसत होता. आगोदरच

 सामान्य प्रकृतीचा त्यात त्याला करोना झाला तर काय ? असा प्रश्‍न मला पडायचा. त्याने केलेेले काम राज्यातील २८८ आमदारांमध्ये एक नंबरचे ठरल्याचे गौरवोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले. नीलेशने केलेल्या कामाची ही वस्तुस्थिती आहे.

माझ्या आया – बहिणींना हे समजले पाहिजे यासाठी मी हे सांगत असल्याची पुष्टीही पवार यांनी यावेळी बोलताना जोडली.अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील येथील संत निळोबाराय महाराजांच्या राहत्या वाडयाचा जिर्णोध्दार तसेच संत निळोबाराय महाराजांच्या गाथेचा

प्रकाशन सोहळा रविवारी पार पडला. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पवार बोलत होते.देवगड देवस्थानचे महंत भास्करगिरीजी महाराज, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार नीलेश लंके, माजी आमदार पोपटराव गावडे, जि. प. च्या अध्यक्षा राजश्री घुले, राष्ट्रवादीचे

जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, चैतन्य देगलूरकर, ज्ञानदेव पठारे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, संचालक प्रशात गायकवाड, अशोक सावंत, बाबाजी तरटे, सबाजी गायकवाड, विक्रमसिंह कळमकर, अ‍ॅड. राहूल झावरे, संदीप चौधरी, विजय औटी, गोपाळबुवा मकाशिर, सुभाष गाजरे,

अमोल पोटे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलिस अधिक्षक मनोज पाटील, प्रांताधिकारी सुधाकर भोसले आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी बोलताना पवार म्हणाले, जगाला करोनाच्या संकटाने ग्रासले जाईल असे मनातही आले नव्हते. फार पुर्वी प्लेगच्या साथीमुळे

अनेक लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतरच्या काळात वैद्यकिय क्षेत्रात मोठया प्रमाणात संशोधन झाले. तरीही करोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले. मी, मी म्हणणारे लोक मृत्यूमुखी पडले. आपल्या जिवाभावाचे लोक आपल्याला सोडून गेले. आजही रशिया,

चिनमध्ये करोना फोफावतो आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी सर्वांनी लसीचे दोन्ही डोस घ्या अशी हात जोडून विनंती करतो असे सांगताना आता म्हणाल आता करोना गेला कशाला लस घ्यायची ? मात्र तसे नाही. करोनाच्या निमित्ताने आपल्याला आपल्या जिवनशैलित अमुलाग्र बदल करावे लागतील असे पवार म्हणाले.

करोना पुन्हा फोफावल्यावर पुन्हा लॉकडाऊनचा कठोर निर्णय घ्यावा लागेल. लग्नसराई सुरू झाली असून देशात २५ लाख विवाह होणार आहेत. त्यापैकी एकट्या महाराष्ट्रात २५ लाख विवाह आहेत. विवाहात गर्दी होणार आहे. तेथे करोनाचा फैलाव होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यानंतर आर्थिक घडी बिघडते. विकासकामे ठप्प होतात. रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण होतो. त्यामुळे करोनाला गांभीर्याने घ्या असा सल्ला त्यांनी दिला.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!