Friday, December 3, 2021

लसीकरण वाढवण्यासाठी सरपंचावर मोठी जबाबदारी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणात पिछाडीवर राहिलेल्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत काही दिवसांपूर्वी बैठक घेतली होती. पर्यटनाच्या दृष्टीने एवढा महत्वाचा असलेला औरंगाबाद जिल्हा लसीकरणात मागे राहता कामा नये, अशा सूचना

पंतप्रधानांनी या बैठकीत दिल्या होत्या. त्यानंतर जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक उपक्रम हाती घेतले. त्यामुळे औंरगाबागदचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नवीन आदेश काढले आहे.

ग्रामीण पातळीवरील लसीकरण वाढवण्यासाठी आता सरपंचांवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. यासोबतच लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी 100 टक्के लसीकरण झालेल्या पहिल्या 25 गावांना निधी देणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.

लसीकरण प्रक्रियेत औरंगाबाद जिल्हा पिछाडीवर राहिल्यानंतर मागील दहा दिवसांपासून जिल्ह्यात युद्ध पातळीवर लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात येत आहे. या आधी ही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कोरोना लसीचे प्रमाणपत्र नसलेल्या नागरिकांना रेशन, पेट्रोल, पर्यटन आधी सुविधा

मिळणार नाही, असे आदेश काढले होते. पण ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जाऊन जिल्हाधिकारी जनजागृती करत आहेत. गल्ले बोरगाव, वेरूळ, तलाववाडी, शुलीभंजन, कागजीपुरा येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामसभा पार पडल्या.

जिल्हाधिकाऱ्यांचा ग्रामीण भागातील मुक्काम चर्चेचा विषय होता. सरपंच विशाल खोसरे, उपसरपंच रामदास चंद्रटिके, पोलीस पाटील सिंधू बढे, तुकाराम हरदे, संजय भागवत, संतोष राजपूत, दिलीप बेडवाल यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या काढलेला आदेशावरुन औंरगाबादमधील लसीकरणाचा वेग वाढेल असा अंदाज दर्शविला जात आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!