Friday, December 3, 2021

विचित्र:महिला नर्सच अंघोळ करताना चित्रिकरण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना ड्युटी करून निवासासाठी पुण्यातील शासकीय विश्रामगृहात (आयबी गेस्ट हाउस) आलेली परिचारिका महिला अंघोळ करीत असताना सुरक्षारक्षकाने व्हिडिओ चित्रण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी परिचारिकेच्या तक्रारीवरून सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल झाला असून, बंडगार्डन पोलिसांनी त्याला अटक केली आहे.अशोक तुकाराम चव्हाण अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका ३६ वर्षीय महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हा प्रकार सोमवारी (२२ नोव्हेंबर) मध्यरात्री घडला. तक्रारदार परिचारिका या नजीकच्या सरकारी रुग्णालयात नोकरीस आहेत. महिला या सरकारी रुग्णालयात परिचारिका म्हणून कर्तव्यावर आहेत.सध्या त्यांना कोरोना ड्युटी करत आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने त्यांची ‘आयबी गेस्ट हाउस’ येथे राहण्याची सोय केलेली आहे.

सोमवारी मध्यरात्री त्या काम संपल्यानंतर गेस्ट हाउस ला गेल्या. ‘करोना ड्युटी’ करून आल्याने ‘गेस्ट हाउस’मध्ये गेल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम आंघोळ केली.तक्रारदार आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेल्या. त्या वेळी तेथे ड्युटीवर असलेल्या सुरक्षारक्षकाने त्यांच्या बाथरूमच्या खिडकीजवळ येऊन,

त्यांचे आंघोळ करतानाचे फोटो आणि व्हिडिओ काढले असल्याचा आरोप महिलेने केलाय, खिडकीबाहेर कोणीतरी असल्याची शंका आल्याने तक्रारदार महिलेने बाहेर येऊन पाहणी केली. मात्र, त्यांना कोणीच दिसले नाही.

CCTV मुळे सापडला आरोपी :
दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्यानुसार पोलिसांनी तातडीने ‘गेस्ट हाउसमधील त्यांच्या रुमबाहेरील परिसरातील सीसीटीव्ही तपासले,

तेव्हा सुरक्षारक्षक बाथरूमजवळ आढळून आला. पोलिसांनी त्याला अटक केली होती, सध्या त्याची जामिनावर सुटका झालीय.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!