Wednesday, December 8, 2021

नगर जिल्ह्याच्या शेजारीला प्रकार धक्कादायकः पोटच्या पोरीलाच प्रियकराच्या हवाली केलं

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याची खुली सूट प्रियकराला देणाऱ्या आईला औरंगाबाद पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमालाही अटक केली. शहरातील पुंडलिक

नगर पोलीस स्टेशनमध्ये मुलीच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहम गाडे व त्याच्यासोबत अनैतिक संबंध असलेली महिला या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेल्या

अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, पतीशी पटत नसल्याने सदर विवाहिता अल्पवयीन मुलगी व मुलासह गारखेडा परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होती. गेल्या सहा वर्षांपासून सोहम गाडे महिलेला भेटण्यासाठी घरी येत होता. रात्रीही मुक्काम करत होता.

मुलीने तक्रारीत म्हटले की, ऑगस्ट 2020 मध्ये आईने भावाला मामाकडे पाठवले. त्यादिवशी सोहम गाडे घरी आला. आईचे व त्याचे काहीतरी बोलणे झाले. तो बळजबरी करू लागला तेव्हा आईनेही संमती दिली. त्यानंतर काही दिवसांनी दोन वेळा त्याने असेच कृत्य केले.

अखेर आई व सोहम याच्या त्रासाला कंटाळून तिने घर सोडले. पण दुसरीकडे आसरा न मिळाल्याने पुन्हा घरी आली.अत्याचार झाल्याची माहिती कुणाला दिल्यास जीवे मारू, अशी धमकी आई आणि सोहम गाडे याने दिल्याचे मुलीने तक्रारीत म्हटले आहे.

मात्र आईची मुलीला मामाच्या घरी पाठवून लग्न लावून देण्याची दिसताच, तिने चाइल्ड हेल्पलाइनला संपर्क केला. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. पुंडलिक पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!