Tuesday, November 30, 2021

जरी तुमच्या बॅंक खात्यात नसतील पैसे, तरी मिळतील १०,००० रुपये, पाहा कसे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:तुमचे बॅंकेत खाते आहे आणि त्यात पैसे नसतील तरी तुम्हाला १०,००० रुपये मिळू शकतात. यासाठी तुमचे बॅंक खाते जनधन खाते असले पाहिजे. जर तुम्ही प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत खाते सुरू केलेले नसेल तर आताच सुरू करा.

जन धन योजनेअंतर्गत झीरो बॅलन्सवर खाते सुरू केले जाते. केंद्र सरकारच्या या योजनेला ७ वर्षे पूर्ण झाली आहे आणि याद्वारे आतापर्यत ४१ कोटीपेक्षा जास्त खाते सुरू करण्यात आली आहेत. या योजनेत विम्यासह अनेक प्रकारच्या सुविधा मिळतात. यामधीलच एक सुविधा ओव्हरड्राफ्टची आहे.

जन धन योजनेअंतर्गत तुमच्या खात्यात बॅलन्स नसल्यावरदेखील तुम्हाला १०,००० रुपयांपर्यतची ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळेल. ही सुविधा अल्पकालावधीच्या कर्जाप्रमाणेच आहे. आधी ही रक्कम ५,००० रुपये होती. सरकारने आता यात वाढ करून ती १०,००० रुपये केली आहे.

या खात्यामध्ये ओव्हरड्राफ्टच्या सुविधेसाठी कमाल वय ६५ वर्षे आहे. ओव्हरड्राफ्टच्या सुविधेचा फायदा घेण्यासाठी तुमचे जन धन खाते किमान ६ महिने जुने असले पाहिजे. असे नसल्यास फक्त २,००० रुपयांपर्यतचा ओव्हरड्राफ्ट मिळतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये स्वातंत्र्यदिनाला भाषण करताना जनधन योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. याचवर्षी २८ ऑगस्टला या योजनेची सुरूवातदेखील झाली होती. या योजनेअंतर्गत ६ जानेवारी २०२१ पर्यत जनधन

खात्यांची एकूण संख्या ४१.६ कोटी झाली आहे. सरकारने २०१८ मध्ये आणखी सुविधा आणि लाभांसह याची दुसरी आवृत्ती सुरू केली होती.जन धन योजनेअंतर्गत १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाचे/मुलीचे खाते सरू करता येते या योजनेअंतर्गत खाते सुरू केल्यावर

तुम्हाला रुपे एटीएम कार्ड, २ लाख रुपयांचा अपघात विमा संरक्षण, ३०,००० रुपयांचे लाइफ कव्हर आणि जमा केलेल्या रकमेवर व्याज मिळते. या योजनेत १०,००० रुपयांच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते. या योजनेत कोणत्याही बॅंकेत खाते सुरू करता येते. या खात्यात तुम्हाला मिनिमम बॅलन्स ठेवण्याची आवश्यकता नसते.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!