Saturday, January 22, 2022

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने ओवरटेक करण्याच्या नादात

श्रीरामपुरकडून भोकरफाटाकडे जाणाऱ्या सिटी हंड्रेडला जोरदार धडक दिली.या अपघातात सिटी हंड्रेडवरील रवी पटारे,राहुल चक्रनारायण, जनार्दन डोळस हे खोकर येथील रहिवासी असलेले तरुण गंभीर जखमी झाले आहेत.यातील दोघांना नगरला हलवण्यात आले आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की,ही स्विफ्ट डिझायर गाडी श्रीरामपूर शहरातील एका हॉटेल मालकाची असल्याचे समजते.तसेच या प्रकरणी जखमींचे नातेवाईक व खोकर येथील काही ग्रामस्थ

श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेले असता संबंधित एका पोलीस कर्मचार्‍याने त्यांना जखमींचा जबाब झाल्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगितले.

तरी अद्यापपर्यंत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात या गंभीर अपघाताच्या घटनेबाबत गुन्ह्याची नोंद झालेली नसल्यामुळे खोकर ग्रामस्थांनी प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!