माय महाराष्ट्र न्यूज: राज्यात वादळी वारे, विजांचा कडकडाट व गारपीट अजून पाच दिवस कायम राहणार आहे. विशेषत: मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील
बहुतांश भागांत गारपीट, तर कोकण आणि विदर्भात पावसाची थोडीसी उघडीप राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोल्हापूर, नागपूर, अमरावती, नाशिक या भागांत पाऊस राहील.
राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून विजांचा कडकडाट, वादळी वार्यामुळे गारपीट आणि पाऊस पडत आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस जास्त आहे. कोकणात पडत असलेला पाऊस
थोडासा कमी झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण-विदर्भात 2-3 दिवस पावसाची उघडीप असेल.मुंबईसह कोकणातील 4 जिल्ह्यांत (दि.10, 11) तर विदर्भातील 11 जिल्ह्यांत मंगळवारपासून
3 दिवस (दि.11, 12, 13) अवकाळी वातावरणापासून सुटका होणार आहे. त्यानंतर म्हणजे 15 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचे वातावरण असेल. उर्वरित महाराष्ट्रात म्हणजे नाशिक, नगर, पुणे,
सातारा सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जिल्ह्यात व संपूर्ण मराठवाड्यात 15 एप्रिलपर्यंत केवळ अवकाळी पाऊस पडेल. 16 एप्रिलनंतर राज्यात पाऊस थांबणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.