Saturday, November 27, 2021

नगर ब्रेकिंग:ट्रक व मोटरसायकलचा भीषण अपघात दोन ठार तर एक जखमी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज टिम :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर-बाभळेश्वर या राज्य मार्गावरील ममदापूरनजीक ट्रक व मोटरसायकल यांचा अपघात होऊन यामध्ये दोन जण ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. श्रीरामपूरकडून ट्रक क्रमांक एमएच 12-एच बी 4001 हा बाभळेश्वरकडे जात असताना यादव मळा-ममदापूरजवळ असणार्‍या टिळेकर वस्तीजवळ या ट्रकने बाभळेश्वरकडून येणार्‍या दुचाकी क्रमांक एम एच 12- डि, क्यू, 6149 या

दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात राजेंद्रकुमार बाबूलाल रामकिसन गुजर, राहुल मेहरा हे मोटरसायकलस्वर जबर जखमी झाले. हुल मेहरा व रामकिसन गुजर या दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने या जखमींना प्रवरा

ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेवून गेले असता उपचार सुरु असताना दोघांचाही मृत्यू झाला.या अपघातात अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे.लॉकडाऊनमुळे हे तिघेही आपल्या राजस्थान,

जयपुर गावी जाण्यासाठी निघाले होते; परंतु त्यांना गाडी न मिळाल्यामुळे ते पुन्हा बाभळेश्वरकडून-श्रीरामपूरकडे जात असताना हा भीषण अपघात झाला आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!