Friday, December 3, 2021

सरकारचा नवा आदेश,आणखी 2 विभागांचा अत्यावश्यक सेवेत समावेश

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज टिम : महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढत असल्याने राज्य सरकारने बुधवारी रात्रीपासून नवीन नियमावली जाहीर केली आहे. ‘ब्रेक द चेन’ असं म्हणत लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचना दिल्या.

या निर्बंधांनुसार केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून इतर सर्व हालचालींवर मर्यादा आणण्यात आल्या आहेत. अशातच आता शासनाकडून अत्यावश्यक सेवेमध्ये आणखी दोन विभागांचा समावेश केला आहे.

शासनाने नवा आदेश जारी करत वनविभागातील वेगवेगळी कामे आणि विमान वाहतूक संबंधित कामांना प्रवासासाठी आणि कामासाठी सवलत देत त्यांचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश केला आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह विभागाशी निगडित इतर व्यवसाय यांना मुभा असणार आहे.

तसंच विमान सेवेच्या अंतर्गत येणारे विमानतळ देखभाल, कुरियर, केटरिंग, सुरक्षा या सुविधा देणाऱ्या लोकांना सुद्धा अत्यावश्यक सेवेखाली प्रवास करण्यास मुभा दिली जाणार आहे.

यापूर्वी या दोन विभागांना अत्यावश्यक सेवेत समावेश न केल्यामुळे काही अडचणी तयार झाल्या होत्या. यामुळे राज्य सरकारच्या वतीने आपत्कालीन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांनी यासंदर्भात नवीन नियमावली जाहीर केली आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!