Friday, January 21, 2022

सहकारी सोसायट्या ग्रामीण अर्थकारणाच्या शेतकऱ्याच्या विकासात मोलाचा सहभाग:माजी खासदार तनपुरे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :सहकारी सोसायट्या ग्रामीण अर्थकारणाच्या शेतकऱ्याच्या विकासात मोलाच्या ठरले आहेत शेतकऱ्यांनीही सहकारात आर्थिक शिस्त पाळताना घेतलेल्या कर्जाचा योग्य विनियोग करून वेळेवर कर्जफेड केल्यास संस्थांचे

भवितव्य उज्वल असेल व शेतकऱ्यांची प्रगतीची वाट रुंदावत जाईल असा आशावाद माजी खासदार प्रसादराव तनपुरे यांनी व्यक्त केले आहे.अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गुहा येथील

प्रेरणा विविध कार्यकारी सोसायटीच्या 19 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ तनपुरे कारखाना माजी संचालक उत्तमराव कोळसे होते.राहुरी तालुक्यात 54 सालापासून स्वर्गीय

दादासाहेब तनपुरे यांनी सहकारी सोसायट्या जपण्यासाठी कारखान्यातून सोसायट्यांना अग्रक्रमाने वसूल देण्याचे धोरण राबविले त्याच शिस्तीची पुन्हा गरज असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

प्रेरणा सोसायटीचे संस्थापक ल शिर्डी संस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे म्हणाले राहुरी तालुका स्वर्गीय दादासाहेबांच्या आशीर्वादातून सहकाराचा जनक ठरला आहे प्रेरणा विकास सोसायटीने आर्थिक शिस्त पाळताना गेल्या 19 वर्षात सभासद

पातळीवर शंभर टक्के कर्ज वसुली दिली आहे तालुक्यात एकूण 110 सोसायटी मध्ये आपल्या संस्थेच्या नावलौकिक चांगला आहे . कर्ज घेउन वेळेवर भरल्यास संस्थेस निश्चित च फायदा होतो . कर्ज वसुली हा संस्थेचा आत्मा असून यातूनच ग्रामीण अर्थकारण सक्षम होईल .

जिल्हा सहकारी बँकेने गृहकर्ज पीक कर्ज व इतर कर्ज यासाठी असलेल्या अटी शिथिल करून घेण्यासाठी ज्येष्ठ नेते मा खा प्रसादराव तनपुरे यांनी प्रयत्न करावेत असे आव्हान केले तसेच बँकेकडे गाय गोठा म्हणून घेतलेले कर्जासाठी 31 मार्चपर्यंत

मुदतवाढ मिळविल्यास शेतकरी पुढील पीक कर्जासाठी पात्र राहतील यासाठी जिल्हा सहकारी बँकेकडे प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी तनपुरे यांना केले .गावपातळीवर काम करताना राजकारणातून संस्थांचे आर्थिक नुकसान झाले . त्यासाठी प्रशिक्षित संचालक व सचिव असावे .

तसेच जास्तीत जास्त सभासदांनी कर्ज घेऊन प्रगती साधावी व कर्जफेड वेळेवर परत फेड करून संस्थेच्या प्रगती साठी हातभार लावावा असे आव्हान श्री वाबळे यांनी केले .कार्यक्रमास प्रेरणा पतसंस्था व्हा. चेअरमन मच्छिंद्र शिंदे ,प्रेरणा मल्टिस्टेट व्हा. विष्णुपंत वर्पे,

संचालक अशोक चंद्रे ,मारुती लांबे, मच्छिंद्र हुरुळे, सुजित वाबळे ,राजेंद्र सौदागर, रविंद्र शिंदे, जगन्नाथ वर्पे, संजय शिंदे ,शौकत सय्यद ,अशोक आंबेकर, शिवाजी उर्हे ,संजय शिंदे, डॉ वाबळे, संजय लांबे, सादीक सय्यद सर , बबननाना कोळसे, चंद्रे मॅनेजर व सर्व ग्रामपंचायत

सदस्य संचालक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार संस्थेचे व्हा. चेअरमन अशोकराव उर्हे यांनी मानले.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!