Tuesday, January 18, 2022

महाराष्ट्रात असे’ असतील नवे निर्बंध

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉननं सर्वांचीच चिंता वाढवली आहे. राज्यात ओमायक्रॉनचे रुग्णसंख्याही वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात येत्या ख्रिसमस तसंच नवीन वर्षानिमित नवीन निर्बंध लागण्याची शक्यता आहे.

राज्यातल्या कोविड रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर गुरुवारी टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली.या बैठकीत टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री यांच्यात नव्या निर्बंधावर चर्चा करण्यात आली आहे.

ख्रिसमस, नवीन वर्षाचं सेलिब्रेशन अशावेळी कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीनं बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. याबाबत उद्या 24 रोजी म्हणजेच नवी नियमावली जाहीर करण्यात येणार आहे .

असे असू शकतात नवे निर्बंध

कोविड 19 संसर्गाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकारचे आरोग्य सुरक्षात्मक खबरदारीचे पाऊल उचलणार.सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी नवे निर्बंध लागण्याची शक्यता

रात्री जमाव बंदी किंवा संचारबंदीचे 144 कलम लागण्याची शक्यता लग्न समारंभ, ख्रिसमस, न्यू ईयर सेलिब्रेशन आणि इतर सार्वजनिक ठिकाणी सोहळ्यांमध्ये होणारी गर्दी टाळण्यावर राज्य सरकारचा भर

गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या बैठकीत इतर राज्यांनी  लावलेल्या निर्बंधांवर तसंच युरोप, अमेरिकेत कोरोनाची वाढत्या संख्येवरही चर्चा केली गेली.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!