Saturday, January 22, 2022

15 डिसेंबरपासून तिसरी लाट सुरू फेब्रुवारीत कहर?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशात ओमायक्रॉनचे रूग्ण झपाट्यानं वाढत आहेत. ही रूग्णवाढ अशीच होत राहिली तर तिसरी लाट अटळ आहे असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. आयआयटी कानपूरच्या संशोधकांनी तिसऱ्या लाटेबाबाबत धक्कादायक अहवाल दिला. 

कानपूर आयआयटीच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार ओमायक्रॉनमुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. 3 फेब्रुवारीपर्यंत ओमायक्रॉन रूग्णांची संख्या सर्वाधिक असेल.

यादरम्यान देशात दररोज किमान 1 लाख 80 हजार रूग्ण आढळू शकतात,असाही दावा या संशोधकांनी केलाय. ओमायक्रॉनचे सर्वाधिक रूग्ण आढळलेल्या टॉप 10 देशातील आकडेवारीच्या आधारे संशोधकांनी हा अंदाज वर्तवला आहे.

ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेऊन केंद्रीय तसंच राज्य स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. .त्यामुळे लॉकडाऊनची झळ पोहचू नये असं वाटत असेल तर प्रत्येकानं कोरोनाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे.

कारण दुसऱ्या लाटेचा अनुभव पाहता तिसरी लाट कुणालाही परवडण्याजोगी नाही.देशात ओमायक्रॉन रुग्णांची संख्य ३५८वर गेली असून १७ राज्यात रुग्ण आढळले आहेत. यात सर्वाधिक रुग्ण ८८ रुग्ण महाराष्ट्रात आहेत. तर दिल्लीत ६७, तेलंगणामध्ये ३८,

तामिळनाडूत ३४, गुजरातमध्ये ३०, केरळमध्ये २७, राजस्थानमध्ये २२, हरियाणात ४, ओडिशात ४, जम्मू-काश्मिरमध्ये ३, पश्चिम बंगाल, आंध्र प्रेदश आणि उत्तर प्रदेशामध्ये  प्रत्येकी २, चंदिगड, लडाख आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!