Friday, January 21, 2022

हिवाळ्यात स्वेटर घालून झोपणाऱ्यांनी वेळीच सावध व्हा नाहीतर ….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सध्या हिवाळ्याचा हंगाम सुरु आहे. हिवाळ्यामध्ये अनेक शारीरिक व्याधींना सुरुवात होते. काहींना थंडीमुळे अंगदुखीचा त्रास होतो, त्वचेच्यासंबंधित समस्या होतात, थंडी जास्त प्रमाणात वाजते. अशा अनेक समस्यांपासून

दूर राहण्यसाठी हिवाळ्यात वेगवेगळे उपाय केले जातात. या ऋतूमध्ये अनेक जण आपले शरीर उबदार ठेवण्यासाठी उबदार कपडे घालतात. यामुळे हात-पाय दुखीचा त्रास देखील कमी होतो. पण काही लोकं असे असतात

जे रात्री झोपताना सुद्धा उबदार कपडे म्हणजेच स्वेटर घालून झोपतात. पण तुम्हाला हे माहिती आहे का की असे करणे तुमच्यासाठी खूपच धोकादायक ठरू शकते.रात्री झोपताना स्वेटर घालून झोपल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांना आमंत्रण मिळू शकते.

स्वेटर घातल्यामुळे अनेक प्रकारच्या शारीरिक त्रासाला तुम्हाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे रात्री झोपताना स्वेटर घालणे टाळावे. आज आपण रात्री स्वेटर घालून झोपल्यामुळे नेमका काय त्रास होऊ शकतो त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

उबदार कपडे घालून झोपल्याने त्वचा खूप कोरडी होते. यामुळे त्वचेवर खाज येऊ शकते. अशा परिस्थितीत रात्री स्वेटर घालून झोपू नये.

लोकरीचे कपडे परिधान केल्याने शरीरातील उष्णता बाहेर पडू देत नाही त्यामुळे बीपी आणि मधुमेहाच्या रुग्णांची समस्या खूप वाढू शकते. त्यामुळे बीपी आणि मधुमेहाच्या रुग्णांनी तर स्वेटर घालणे टाळावे.

उबदार कपडे घालून झोपल्याने ऑक्सिजनला अडथळा निर्माण होतो. अशा परिस्थितीत तुम्हाला भीतीचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला घाबरल्यासारखे वाटू शकते. यासोबतच श्वास घेण्यासही त्रास होतो.

उबदार कपडे घालून झोपल्याने तुम्हाला रात्री खूप घाम येतो. ज्यामुळे तुमचा बीपी देखील कमी होऊ शकतो. अशा स्थितीत रात्री स्वेटर घालून झोपू नये.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!