Friday, January 21, 2022

अत्यंत महत्त्वाची बातमी: शिर्डीत साई दर्शनासाठीच्या नियमावलीमध्ये बदल

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शिर्डीच्या साईभक्तांसाठी महत्त्वाची बातमी आहे. साई दर्शनासाठी आता नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे संकट निर्माण होत आहे.

वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवे निर्बंध जारी करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर साई दर्शनासाठी असलेल्या पूर्वीच्या नियमांमध्ये बदल करण्याचा

निर्णय शिर्डी संस्थानच्या वतीने घेण्यात आला आहे.जिल्हा प्रशासनाच्या निर्णयानंतर दर्शन व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे. नव्या नियमावलीनुसार आता भक्तांना सकाळी सहा ते रात्री नऊ याच कालावधीमध्ये

साईबाबांचे दर्शन घेता येणार आहे. रात्री नऊ नंतर राज्यात जमावबंदीचे आदेश लावण्यात आले आहेत, जमावबंदीचे आदेश असल्याने रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत मंदीर दर्शनासाठी बंद असेल. पहाटेच्या काकड आरती आणि शेजारतीला

देखील भक्तांना प्रवेश देण्यात येणार नाही. मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीमध्येच काकड आरती होणार आहे. तसेच मंदिर परिसरात भक्तांनी कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळावेत असे आवाहन देखील मंदिर आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने देखील राज्यात शिरकाव केला आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रशासनाकडून जमावबंदीचे आदेश लागून करण्यात आले आहेत. रात्री 9 ते पहाटे 6 पर्यंत राज्यात जमावबंदी असणार आहे.

या काळात पाच पेक्षा अधिक लोक एकत्र आल्यास कारवाई होऊ शकते. तसेच नववर्षांच्या पार्श्वभूमीवर देखील अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. कोरोना संकट पहाता नववर्षांच्या मोठ्या पार्ट्यांवर बंदी घालण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!