Thursday, January 20, 2022

नायजेरिया येथून नगर जिल्ह्यात आलेली ओमिक्राॅनबाधित महिला उपचारानंतर….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: नायजेरिया येथून श्रीरामपूरात आलेल्या ओमिक्राॅन पाॅझिटीव्ह महिलेचा उपचारानंतर कोरोना तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने महिलेसह तिच्या मुलाला

नुकतेच सुखरुप घरी सोडण्यात आले आहे.ओमिक्राॅन पाॅझिटीव्ह महिलेने शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले. असून काल (रविवारी) त्यांची पुन्हा ओमिक्राॅनची तपासणी केली. त्यात सदर महिलेसह सहा वर्षीय मुलाचा

तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली.ओमिक्राॅन पाॅझिटीव्ह महिलेने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले होते. तसेच त्यांच्या कुटूंबातील इतर लोकांनी देखील कोरोना लसीकरण केलेले होते.

त्यामुळे उपचार घेवून त्या लवकर बरया झाल्या. त्यांना पुढील सात दिवस होम क्वारंटाइन ठेवण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.नोकरीनिमित्त नायजेरिया (वेस्ट आफ्रिका) येथे गेलेल्या महिलेसह त्यांचा सहा वर्षांचा मुलगा १५ डिसेंबर रोजी

श्रीरामपूरात आले होते. त्यानंतर १८ डिसेंबर रोजी आरोग्य विभागाने त्यांची कोरोना तपासणी केली. त्यात महिला आणि दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आले.त्यामुळे ओमिक्राॅन तपासणीसाठी त्यांच्या स्रावाचे नमुने तातडीने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले होते.

खबरदारी म्हणून स्थानिक प्रशासनाने त्यांच्या संपर्कातील सुमारे ५५ नागरीकांचा शोध घेवून सर्वांची कोरोना तपासणी केली. सुदैवाने त्यातील सर्वांचे तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आले.परंतू शुक्रवारी (ता.२४) दुपारी तीन वाजेच्या सुमारास महिलेचा

ओमिक्राॅनचा तपासणी अहवाल पाॅझिटीव्ह आला होता. अहमदनगर जिल्ह्यात अखेर ओमिक्राॅनचा शिरकाव झाल्याना जिल्हा प्रशासनासह नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!