Tuesday, January 18, 2022

महाराष्ट्रात पुन्हा ढगाळ स्थिती; तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज 

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मागील चार पाच दिवसांपासून उत्तर भारतात अनेक ठिकाणी कडाक्याच्या थंडीसह पाऊस आणि बर्फवृष्टी होत आहे. याचा परिणाम महाराष्ट्रासह मध्य भारतात जाणवत आहे.

गेल्या आठवड्यापासून राज्यातील किमान तापमानात झपाट्याने चढ-उतार होत आहेत. काल अनेक ठिकाणी तापमानाचा पारा वाढल्यानंतर, आज पुन्हा राज्यात 1 ते 2 अंश सेल्सिअसने किमान

तापमानाचा पारा घसरला आहे. तसेच राज्यात सध्या ढगाळ स्थिती निर्माण झाली असून येत्या काही दिवसांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.राज्यात एकीकडे थंडीचा

कडाका सुरू असताना, खान्देश आणि विदर्भात सरी बरसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, येत्या 6 जानेवारीपासून उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे मुंबईसह महाराष्ट्रात

पुढील चार दिवस थंडीमध्ये कोणताही बदल होणार नाही. मात्र आगामी काही दिवसांत वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे.6 जानेवारीनंतर उत्तर महाराष्ट्र, नाशिक, खान्देश आणि विदर्भात अनेक ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे.

तर काही भागात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित भागात हुडहुडी वाढण्याची शक्यता आहे. तसेच राज्यात सकाळी धुके, तसेच मंद प्रकाश अशी स्थिती राहू शकते.

येत्या काही दिवसांत पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात या भागात गारवा वाढू शकतो. हरियाणात पुढचे सातही दिवस थंडीची लाट असण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे तामिळनाडूमध्ये मात्र जोरदार पावसाची दाट शक्यता आहे.

अलीकडेच तामिळनाडूच्या किनारी प्रदेशात आणि आसपासच्या भागांत पावसानं थैमान घातलं आहे.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!