Tuesday, January 18, 2022

मंत्री शंकरराव गडाखांचे सुपुत्र अडकणार लग्नाच्या बेडीत; माजी आमदार चंद्रशेखर घुलेंच्या मुलीसोबत साखरपुडा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : राहुल कोळसे प्रतिनिधी : अहमदनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे नातू व राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे चिरंजीव उदयन गडाख यांचा विवाह अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव – पाथर्डीचे राष्ट्रवादीचे

माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची कन्या डॉ. निवेदिता यांच्याशी होणार आहे. आज त्यांचा साखरपुडा पार पडला. गडाख व घुले कुटुंबीयांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. हे दोन राजकीय कुटुंब नात्यामध्ये अडकल्याचे पहायला मिळाले.

लग्न ठरल्यापासून जिल्ह्यात या लग्नाची मोठी चर्चा आहे. अखेर आज उदयन आणि डॉ. निवेदिता यांचा साखरपुडा पार पडला.उदयन गडाख यांचा विवाह अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले

यांची कन्या डॉ. निवेदिता यांच्याशी करण्याचे ठरले आहे. त्यांचा आज साखरपुडा पार पडला. डॉ. निवेदिता या पुण्यातील भारती विद्यापीठात रेडिओ डायग्नोसिसमध्ये एमडीच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहेत.

तर उदयन गडाख यांनी अहमदनगर येथे एमबीएचे शिक्षण पूर्ण केले असून. ते राजकारणात सक्रिय झाले आहेत.दरम्यान शिर्डी देवस्थानचे अध्यक्ष तथा आमदार आशुतोष काळे हे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे मोठे जावई आहेत.

तर घुले यांचे दुसरे जावई हे आता उदयन गडाख होतील. चंद्रशेखर घुले हे राष्ट्रवादीत आहेत. तर गडाख हे शिवसेनेचे मंत्री आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांचे आपसातील नातेसंबंधांची आता चांगलीच

चर्चा होऊ लागली आहे. हे नातेसंबंध पुढील राजकारणाच्या दृष्टीने देखील दोन्ही कुटुंबाला फायद्याचे ठरणार असल्याचे बोलेले जात आहे.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!