Monday, January 17, 2022

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचा पहिला इथेनॉल टँकर गुजरातकडे रवाना

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर स.सा. कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पातून उत्पादित झालेल्या इथेनॉलचा पहिला टँकर गुजरात राज्यातील हाजीरा येथील भारत पेट्रोलियम कंपनीच्या ऑइल डेपोसाठी रवाना झाला आहे.

कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे हस्ते पहिल्या इथेनॉल टँकरचे पूजन करण्यात आले.
यावेळी संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग,काशिनाथ नवले,अशोकराव मिसाळ, शिवाजीराव कोलते,दादासाहेब गंडाळ, डॉ.शिवाजी शिंदे,कारखान्याचे कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, डिस्टीलरी इनचार्ज महेंद्र पवार,चिफ इंजिनिअर राहुल पाटील,प्रशासकीय अधिकारी कारभारी गायके,कामगार अधिकारी बाळासाहेब डोहाळे, सीनिअर डिस्टिलरी केमिस्ट पराग कुलकर्णी,इंजिनिअर योगेश काळे,वेअर हाऊस सुपरवायझर सोपान पागिरे,अरविंद ठाणगे,इब्राहिम सय्यद,विष्णुपंत वाबळे,राजेंद्र काकडे आदीसह सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र घुले पाटील म्हणाले,केंद्र शासनाने राबविलेल्या इथेनॉल निर्मिती धोरणास प्रतिसाद देत लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने उभारलेल्या 50 हजार लिटर प्रतिदिन इथेनॉल निर्मिती प्रकल्पाची उभारणी पूर्ण होऊन दि.7 जानेवारी अखेर 14 लाख 6 हजार 365 लिटर इथेनॉल निर्मिती झालेली आहे.इथेनॉल पुरवठा वर्ष 2021-22 करीता 89 लाख 8 हजार लिटर इथेनॉल पुरवठा करण्याचा करार ऑईल कंपन्याशी करुन त्यांचे मागणीनुसार इथेनॉल पुरवठा करण्यात येणार आहे.ऑइल कंपन्यांशी झालेल्या करारानुसार महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात राज्यातील संबंधीत कंपन्याच्या ऑइल डेपोला त्यांचे मागणीनुसार पेट्रोल मध्येमिश्रण करण्यासाठी लागणारे 100 टक्के शुद्ध इथेनॉल पुरविण्यात येणार आहे. साखर कारखान्याने आज अखेर कारखान्याने दि.7 जानेवारी अखेर 5 लाख 69 हजार 860 मे.टन ऊसाचे गाळप केले असून ही सर्वांसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!