Friday, January 21, 2022

१३ जानेवारीपर्यंत गारपिटीसह पावसाची शक्यता

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा विभागात पुढील तीन दिवसांत विजांच्या कडकडाटासह गारपिट आणि पावसाची शक्यता आहे. याबाबत हवामान विभागानं अंदाज व्यक्त केला असून मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तापमानात घट होण्याची देखील शक्यता आहे.

आज देखील विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाचं आगमन झालं. भंडारा, चंद्रपूरमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. तसेच नागपुरात सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. नागपूरकरांना सूर्याचं दर्शन देखील झालं नाही.

आता येत्या १३ जानेवारीपर्यंत मराठवाडा आणि विदर्भात गारपिटीसह पावसाची शक्यता आहे. तसेच इतर भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आज मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदडे, तर विदर्भातील यवतमाळ, वर्धा आणि नागपूरला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आणि भंडारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

११ ते १३ जानेवारीपर्यंत पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.पावसाबरोबरच नागरिकांना कडाक्याच्या थंडीचाही सामना करावा लागणार आहे. कारण, मध्य महाराष्ट्रात तापमान २-३ अंश घसरणार असल्याचा अंदाज

हवामान विभागानं व्यक्त केलाय. तसेच उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आली असून त्याचा परिणाम विदर्भावर होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!