Friday, January 21, 2022

भाजपचे आमदार सेक्स स्कँडलमध्ये अडकल्याने पक्ष सोडत आहे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:गोवा भाजपचे आमदार सेक्स स्कँडलमध्ये अडकल्याने पक्ष सोडत आहेत असा गंभीर आरोप काँग्रेसचे गोवाच्या प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी केला आहे. एवढंच नाही तर आमची राष्ट्रवादी काँग्रेससोबत बोलणी सुरू आहेत असंही त्यांनी सांगितलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेससोबत आम्ही गोव्यात एकत्र येऊ शकतो असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.गोव्यात यावेळी चित्र काय असेल असं विचारलं असता दिनेश गुंडूराव म्हणाले की यावेळी गोव्यात त्रिशंकू विधानसभा नसणार. गेल्यावेळी जे घडलं ते यावेळी

होणार नाही, त्यामुळे आम्हाला बहुमत मिळेल असा विश्वासच एकप्रकारे गुंडूराव यांनी व्यक्त केला आहे. तृणमूलसोबत तुम्ही जाणार का? असं विचारलं असता दिनेश गुंडूराव म्हणाले की आमचं राजकीय शत्रुत्व उघड आहे त्यामुळे आम्ही तृणमूलसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही.

तृणमूल काँग्रेसचा गोव्यात येण्याचा उद्देशच काँग्रेसला कमकुवत करणं हा आहे. आम्ही अशा पक्षासोबत हातमिळवणी कशी काय करणार? तृणमूलसोबत जायचं नाही ही आमची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे.

त्यामुळे त्यांच्याशी हातमिळवणी करण्याचा, आघाडी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.गेल्या वेळच्या निवडणुकीतही आमचाच विजय झाला होता. भाजपने मागच्या दाराने येऊन सत्ता काबीज केली. आता तिथे मनोहर पर्रिकर नाहीत. ते असोत की नसोत

आमचा विजय होणार आहे हे आम्हाला ठाऊक आहे आम्हाला आमच्या विजयाची खात्री आहे असंही गुंडूराव यांनी स्पष्ट केलं.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!