Tuesday, January 18, 2022

चारचाकी वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाचे; गडकरींचा मोठा निर्णय

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशात रस्ते अपघाताचं प्रमाण सर्वाधिक आहे. बेदरकारपणे गाडी चालवणं, खराब रस्ते, वाहतुक नियमांचं पालन न करणं यामुळे अपघात होण्याचं आणि मृत्यू होण्याचं प्रमाणही अत्यंत जास्त आहे. वाहतुकीचे नियम पाळण्यासंदर्भात वेळोवेळी

आवाहन करुनही अनेक वाहनचालक याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. नितीन गडकरी यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी ट्विट केलंय की, “मी 8 प्रवाशांपर्यंत वाहतूक करणाऱ्या मोटार वाहनांमध्ये किमान 6 एअरबॅग अनिवार्य करण्यासाठीच्या जीएसआर अधिसूचनेचा मसुदा आज मंजूर केला आहे.

आता कारमध्ये 6 एअरबॅग्स अनिवार्यज्या वाहनांमधून आठ प्रवासी वाहतुक होते अशा वाहनांमध्ये आता 6 एअरबॅग्स असणं अनिवार्य असणार आहे. प्रवास सुरक्षित होण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. सामान्यत: मध्यमवर्गीय लोकांकडून

लहान कार खरेदी केल्या जातात. यात साधारण दोन एअरबॅग्स असतात. ऑटोमेकर्स फक्त मोठ्या आणि महागड्या कारमध्येच जास्त एअरबॅग देतात. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याआधीच लहान आणि स्वस्त कारमध्येही सहा एअरबॅग्स देण्याचं

आवाहन कार उत्पादक कंपन्यांना केलं होतं. भारतीय ग्राहकांची सर्वाधिक पसंती ही त्यांच्या बजेटमध्ये बसणाऱ्या कारला असते. या वाहनांमध्ये 6 एअरबॅग दिल्या गेल्या तर त्यांच्या किमती नक्कीच वाढण्याची शक्यता आहे.

दोनपेक्षा जास्त एअरबॅगच्या संख्येत वाढ झाल्यामुळे किमतीत 8 ते 9 हजार रुपयांचा फरक पडू शकतो.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!