Thursday, January 20, 2022

संक्रांती निमित्त सिकची परीवाराकडून गरजू कुटुंबास उबदार कपड्याचे वाटप

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

सोनई/नेवासा

मकर संक्रांतीच्या निमित्ताने सोनई येथील सिकची परीवाराने दुर्लक्षित व गरजू कुटुंबास वाण वाटप म्हणून थंडी पासून सरंक्षण व्हावे याकरीता अंगावर घेण्याचे रग व मिठाईचे वाटप केले.तिळगुळ वाटप व हळदीकुंकु कार्यक्रम करण्यात आला. या सामाजिक कार्याचे परीसरात कौतुक होत आहे.

कौतुकी नदीच्या रामझिरा परीसरात राहत असलेले दहा ते पंधरा कुटुंब फिरस्तीचा व्यवसाय करुन उपजीविका करतात.कापडी पालात राहत असलेल्या या कुटुंबातील महिलांना संगिता सिकची यांच्या हस्ते संक्रांतीचा वाण म्हणून उबदार कपडे, मिठाई, तीळगुळ देवून हळदीकुंकु करण्यात आले. यावेळी एलआयसीचे एजंट संदीप सिकची,उद्योजक बाळासाहेब सिकची,पत्रकार विनायक दरंदले, यश सिकची उपस्थित होते.

इतभर पोटासाठी दिवसरात्र कष्ट करण्याशिवाय पर्याय नाही. आमच्या नशीबी सण-उत्सव नसतो आज आमच्या कुटुंबात येवून सण साजरा केल्याने मनोमन आनंद झाला.असे तेथील महिलांनी सांगितले.सिकची परीवाराच्या वतीने सर्वाना शुभेच्छा देण्यात आल्या. बाळासाहेब सिकची यांनी तेथील लहान मुलांना मिठाई व तीळगुळाचे वाटप केले.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!