Friday, January 21, 2022

शेतकऱ्यांनो पेर कांद्याचेच पैसे होणार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मजुरांची टंचाई असल्यामुळे शेतकर्‍यांचा कांदा पेरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे. यामुळे शेतकर्‍यांना कांदा पेरणीचा पर्याय अधिक आकर्षक वाटत आहे. मात्र, या पेरणीच्या कांद्याबाबत काही शेतकर्‍यांच्या मनात साशंकता आहे.

पूर्वापार पद्धत सोडून देण्याचे शेतकर्‍यांना धाडस होत नाही. तसेच पेरणीच्या कांद्याचे उत्पादन कमी येते, असाही एक मतप्रवाह आहे; पण पेर कांद्याचे (पेर कांदा) उत्पादन कमी येते हा एक गैरसमज आहे.

शेतकर्‍यांनी कांदापेर केली तर लागवडीपेक्षा लाल तसेच उन्हाळ कांदा 30-35 दिवस लवकर विक्रीसाठी हातात येतो आणि नेमक्या याच वेळेस बाजारात कांद्याचा तुटवडा असतो व भाव अधिक मिळतो. कारण, पेर कांद्याशिवाय जानेवारी, फेब्रुवारी

या दोन महिन्यांत दुसरा कांदा उपलब्ध नसतो. यंदाच्या हंगामात उशिराच्या खरिपाच्या रोपवाटिका खराब हवामानामुळे वाया गेल्या. परिणामी तुटपुंजा लाल कांदा मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्याचेही अवेळी पावसाने नुकसान झाले.

यामुळे पेर कांद्याचे चांगले पैसे देण्यासाठी बाजार समित्या शेतकर्‍यांची वाट बघत असल्याचे चित्र आहे.ऑक्टोबरच्या अखेरीस व नोव्हेंबरच्या सुरुवातीस पेरलेल्या कांद्यास पाणी व सिंचनासाठी वीजपुरवठा चांगल्या प्रमाणात असतो. भारनियमन कमी प्रमाणात असते.

तसेच विजेचा भारही पुरेसा असतो. कारण इतर शेतकर्‍यांचा पाण्याचा उपसा नसल्याने विजेची मागणी कमी असते. यामुळे दोन महिने आरामशीर निघून जातात. पाण्याचे योग्य नियोजन होऊन तुमच्या स्रोताचा थेंब न थेंब वापरला जातो व भविष्यातील लागवड कांद्यावर पाणी भरणीचा ताण येत नाही.

नोव्हेंबर ते जानेवारी या काळात पाणी मागणीच्या तुलनेत फेब्रुवारी ते मे या काळात मागणी जास्त असते. एकाकी उन्हाळ कांदा लागवड झाल्यामुळे 1 फेब्रुवारीपासून अति पाणीउपसा व विजेच्या अधिक वापराने विजेचा खोळंबा होऊन

शेतकर्‍यांना सिंचन करण्यात अडचणी येतात. मात्र, शेतकर्‍यांनी पेर कांदा केलेला असल्यास तो फेब्रुवारीपर्यंत काढला जात असल्याने उन्हाळ कांद्याचे नियोजन चांगले करता येते. विजेच्या खोळंब्यामुळे पिकाला फटका बसून पीक थोडे कोमेजते.

पेर कांदा यावेळेस निघून गेलेला असतो. त्यामुळे राहिलेल्या उन्हाळ लागवडीचे पाणी नियोजन चांगले करता येते.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!