Monday, January 17, 2022

नगरमध्ये खासगी रुग्णालयांना तंबी दिला हा इशारा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना अनेक नागरिक चाचणी करून घेत नाही तसेच परस्पर उपचार घेतात. त्यामुळे प्रशाससनाला नेमकी माहिती मिळत नाही आणि काळजी न घेतल्याने हे रुग्ण सुपरस्प्रेडर ठरण्याची शक्यता आहे.

त्यामुळे महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी खासगी रुग्णालयांना तंबी दिली आहे. महापालिका आरोग्य यंत्रणेला माहिती न देता संशयित करोना रुग्णांवर परस्पर उपचार केल्यास, लक्षणे असतानाही रुग्णांना चाचणी न करण्याचा सल्ला

दिल्ल्यास संबंधित खासगी डॉक्टर आणि रुग्णालयांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.सर्दी, खोकला, ताप अशी सौम्य लक्षणे आढळून येत असल्याने अनेक रुग्ण महापालिकेच्या आरोग्य केंद्रात चाचणी करण्याऐवजी

खासगी डॉक्टरांकडून औषधे घेऊन उपचार करीत आहेत. परंतु यातील संभाव्य करोना रुग्णांमुळे त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य व शेजारील नागरिक यांचे आरोग्य धोक्यात येऊन त्यांना करोनाची लागण होण्याची भीती आहे, असे आयुक्त गोरे यांनी सांगितले.

या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या वतीने खासगी डॉक्टरांना प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. करोना बाधित रुग्णांवर कोणते उपचार करावेत, अशा रुग्णांसाठी कार्यपद्धती काय असावी याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

करोना संदर्भातील चाचणी केल्यानंतर संबंधित रुग्णांची माहिती महापालिकेस उपलब्ध होऊ शकणार आहे. महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनी सांगितले की, खासगी डॉक्टरांनी

करोना चाचणी टाळून, लक्षणे असलेल्या एखाद्या रुग्णावर उपचार केल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!